थार येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 09:24 AM2018-08-24T09:24:09+5:302018-08-24T09:27:12+5:30
थार येथील शेतकऱ्यांने बँकेचे कर्ज व आर्थिक विवंचनेत बसथांब्याजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली.
तेल्हारा (जि.अकोला): थार येथील शेतकऱ्यांने बँकेचे कर्ज व आर्थिक विवंचनेत बसथांब्याजवळ गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी (24 ऑगस्ट) ही घटना घडली आहे.
अजाबराव रामचंद्र फोकमारे (69) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. फोकमारे यांच्याकडे दोन एकर शेती असून शेतीमध्ये सतत होत असलेले नुकसान, नापिकी यामुळे आर्थिक घडी विस्कळीत झाली आणि त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत गेला होता. या विवंचनेत त्यांनी टोकाचा निर्णय घेतला असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. फोकमारे यांनी गावातच बस थांबा परिसरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तेल्हारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.