शेतकरी धडकले तहसीलवर
By admin | Published: October 24, 2015 01:43 AM2015-10-24T01:43:01+5:302015-10-24T01:43:01+5:30
बाश्रीटाकळी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचे शेतकरी संघर्ष समितीची मागणी.
बाश्रीटाकळी/ सायखेड: निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत तीन वषार्ंपासून शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असून, बाश्रीटाकळी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा यासह इतरही मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे बैलगाडीसह शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. समितीने तहसील कार्यालय परिसरात जाऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले. ह्यलोकमतह्णने ८ ऑक्टोबर रोजी शासनाने जाहीर केलेली पैसेवारी आणि वास्तव यावर प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर शेतकर्यांसाठी शेतकरी, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष सरसावले. शुक्रवारी दुपारी बाजार समितीच्या मैदानात सभा झाली. यावेळी समितीचे नेते सुनील धाबेकर, जिल्हा बॅँकेचे संचालक दामोधर काकड, ज्ञानदेवराव ठाकरे, बाबाराव विखे पाटील, सभापती बाबाराव नानोटे, खविसंचे संचालक गजानन आखरे, भारिपचे नेते हिरासिंग राठोड, देवराव पाटील हागे यांनी मनोगत व्यक्त केले. शासनाने शेतकर्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर मोर्चा काढण्यात आला.