शेतकरी कुटुंबावर मधमाशांचा हल्ला; एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 07:55 AM2019-03-31T07:55:33+5:302019-03-31T07:55:55+5:30

अकोट तालुक्यातील उमरा येथील शेतकरी लक्ष्मण सुकोसे, पत्नी रेखाबाई, मुलगा संतोष व नात पूजा (२) हे चौघे जण शनिवारी सकाळी स्वत:च्या शेतात गेले होते.

Farmer family beekeeper attack; One killed, three seriously injured | शेतकरी कुटुंबावर मधमाशांचा हल्ला; एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

शेतकरी कुटुंबावर मधमाशांचा हल्ला; एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

Next

अकोट (जि. अकोला): शेतात काम करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबातील एका चिमुकलीसह तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना अकोट तालुक्यातील उमरा शेतशिवारात शनिवारी घडली. लक्ष्मण प्रल्हाद सुकोसे (५२) यांचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अकोट तालुक्यातील उमरा येथील शेतकरी लक्ष्मण सुकोसे, पत्नी रेखाबाई, मुलगा संतोष व नात पूजा (२) हे चौघे जण शनिवारी सकाळी स्वत:च्या शेतात गेले होते. शेतात मशागतीचे काम केल्यानंतर १०.३० वाजेच्या सुमारास हे कुटुंब शेतातील लिंबाच्या झाडाखाली जेवण करण्यासाठी बसले. जेवण सुरू असतानाच माकडांनी उड्या मारल्यामुळे झाडावरील मधमाशांचे मोहोळ उठले. चवताळलेल्या मधमाशांनी झाडाखाली बसलेल्या सुकोसे कुटुंबीयांवर हल्ला चढविला. हा हल्ल्याने सर्वजण गंभीर जखमी झाले. मधमाशांचा दंश असह्य झालेल्या सुकोसे कुटंबीयांनी घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला; परंतु मधमाशांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. सुनील वर्तने हे सुकोसे कुटुंबीयांच्या मदतीला धावले. जखमी झालेल्यांना तातडीने अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान लक्ष्मण सुकोसे यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या संतोष, रेखाबाई व पूजा यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 

Web Title: Farmer family beekeeper attack; One killed, three seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.