सामायिक खात्यामधील शेतकरी कुटुंबही ‘पीएम-किसान’साठी पात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 02:28 PM2019-07-09T14:28:18+5:302019-07-09T14:28:26+5:30

अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ लागू करण्यात आला आहे.

Farmer family in shared account entitled for PM-Kissan scheme | सामायिक खात्यामधील शेतकरी कुटुंबही ‘पीएम-किसान’साठी पात्र!

सामायिक खात्यामधील शेतकरी कुटुंबही ‘पीएम-किसान’साठी पात्र!

googlenewsNext

- संतोष येलकर

अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ लागू करण्यात आला आहे. त्यानुषंगाने संयुक्त-सामायिक खात्यामधील (सात-बारावर एकापेक्षा जास्त नावे असलेली) शेतजमीन कसणारी शेतकरी कुटुंबही ‘पीएम-किसान’ योजनेसाठी पात्र ठरतात. त्यामुळे सामायिक खात्यामधील शेतकरी कुटुंबांना योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी राज्यातील विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाºयांना ४ जुलै रोजी पत्राद्वारे दिले आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमिनीची मर्यादा शिथिल करण्यात आली असून, सरसकट सर्व शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष तीन समान हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या ७ जून २०१९ रोजीच्या आदेशानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्रतेच्या निकषात बसणारे सर्व शेतकरी पात्र आहेत. त्यानुषंगाने संयुक्त-सामायिक खात्यामधील (सात-बारावर एकापेक्षा जास्त नावे असलेली) आणि शेतजमीन कसत असलेली शेतकरी कुटुंबही ‘पीएम-किसान’ योजनेच्या लाभासाठी पात्र ठरतात. त्यामुळे सामायिक खात्यामधील समाविष्ट शेतकरी कुटुंबांची खात्री करून, त्यांना ‘पीएम-किसान ’ योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी कृषी आयुक्त, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांना ४ जुलै रोजी पत्राद्वारे दिले आहेत.

शेतकरी कुटुंबांची माहिती सादर करण्याच्या सूचना!
कृषी सचिवांच्या निर्देशानुसार संयुक्त-सामायिक खात्यामधील समाविष्ट शेतकरी कुटुंबांना ‘पीएम-किसान’ योजनेचा लाभ देण्यासाठी अकोला तालुक्यातील सामायिक खात्यामधील शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करून तातडीने सादर करण्याच्या अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व तालुक्यातील मंडळ अधिकाºयांना दिले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यातही प्रशासनामार्फत यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

 

Web Title: Farmer family in shared account entitled for PM-Kissan scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.