‘वंचित’चा शेतकरी-शेतमजूर आक्रोश मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 01:20 PM2019-11-23T13:20:26+5:302019-11-23T13:20:32+5:30

अकोला शहरातील गांधी-जवाहर बाग येथून शेतकरी-शेतमजूर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

Farmer-farmer's labor outcry against 'deprived' | ‘वंचित’चा शेतकरी-शेतमजूर आक्रोश मोर्चा!

‘वंचित’चा शेतकरी-शेतमजूर आक्रोश मोर्चा!

Next

अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्यात यावी आणि शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यात यावा, यासह शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीअकोला जिल्हा शाखेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी-शेतमजूर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाºयांना देण्यात आले.
पीक नुकसान भरपाईपोटी एकरी १० हजार रुपयांची मदत तातडीने शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात यावी, शेतकºयांचा सात-बारा कोरा करून हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत देण्यात यावी, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व शेतकरी पाल्य विद्यार्थ्यांना सवलती लागू करण्यात याव्या, शेतकरी व शेतमजुरांना सरसकट कर्जमाफी व दुष्काळाच्या उपाययोजना लागू करण्यात याव्या, शेतमजुरांना बिनव्याजी १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात यावे, शेतकºयांच्या शेतमालाची प्रतवारी न करता हमीदराने खरेदी करण्यात यावी, ई-क्लास अतिक्रमित जमिनी नियमानुकूल करण्यात याव्या व शेतकरी-शेतमजुरांना सहा महिने मोफत रेशन पुरविण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा शाखेच्यावतीने अकोला शहरातील गांधी-जवाहर बाग येथून शेतकरी-शेतमजूर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
गांधी मार्ग, पंचायत समितीसमोरून मार्गक्रमण करीत आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना देण्यात आले.
या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, अरुंधती सिरसाट, माजी आमदार बळीराम सिरस्कार, डी. एन. खंडारे, रमेश भोजने, पुष्पा इंगळे, दामोदर जगताप, बालमुकुंद भिरड, बळीराम चिकटे, प्रभा सिरसाट, शोभा शेळके, प्रदीप वानखडे, सागर कढोणे, आकाश सिरसाट, मदन भरगड, प्रतिभा अवचार, अ‍ॅड. संतोष रहाटे, गजानन गवई, मनोहर पंजवानी, सुरेश पाटकर, किरण बोराखडे, अ‍ॅड. धनश्री देव, बबलू जगताप, काशीराम साबळे, संध्या वाघोडे, शरद गवई, प्रा. संतोष हुशे, चंद्रशेखर पांडे गुरुजी, सचिन शिराळे, विकास सदांशिव, सम्राट सुरवाडे, अशोक सिरसाट, सुरेंद्र तेलगोटे, सुरेश सिरसाट, पराग गवई, डॉ. सुनील जाधव, ज्ञानेश्वर सुलताने, विद्या अंभोरे, रंजना गेडाम, योगीता वानखडे, सुनीता वानखडे, कविता राठोड, सुषमा कावरे, प्रा. मंतोष मोहोड, सुनीता हिवराळे, अनुराधा ठाकरे, संगीता खंडारे, मंगला सिरसाट, सम्राट तायडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Farmer-farmer's labor outcry against 'deprived'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.