खाडे भरण्यासाठी शेतकऱ्याचा जुगाड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 11:46 AM2020-07-04T11:46:23+5:302020-07-04T11:47:18+5:30
पेरणी केल्यानंतर तासांमध्ये खाडे किंवा बखया पडल्या आहेत, अशा जागेत पुन्हा रोप लावणे सोपे जावे म्हणून यंत्र बनविले.
- सत्यशील सावरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : पावसाच्या अनियमिततेने पेरलेले बियाणे निघालेच नाही, तर कुठे तासांमध्ये बियाणे जास्त निघल्याचा प्रकार पाहावयास मिळतो. ज्या ठिकाणी बियाणे निघाले नाही, ती जागा तशीच राहू नये यासाठी तेल्हारा तालुक्यातील वरुड वडनेर येथील शेतकºयाने देशी जुगाड करून यंत्र बनविले. या यंत्राद्वारे एका ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा जास्त रोप निघाले त्या ठिकाणचे रोप उपटून ज्या ठिकाणी रोप निघाले नाही, अशा खाड्यांच्या ठिकाणी लावण्यासाठी मदत होत आहे. या यंत्रामुळे खाडे भरण्यासाठी लागणारी मेहनत व वेळ वाचत असल्याने शेतकºयाचे कौतुक होत आहे.
शेतकरी आपले पिकांच्या संगोपनासाठी नानाविध शक्कल लढवून व मेहनतीने पीक उत्पादन घेताना दिसतात अशीच एक साधी वाटणारी पण शेतकरी उपयोगी जुगाड टेक्नॉलॉजी उकळीच्या शेतकरी कारागिराने करून शेतकऱ्यांना मशागतीसाठी सहकार्य केले आहे. तालुक्यातील वरुड वडनेर येथील युवा शेतकरी शिवाजी प्रल्हाद दही यांनी शेतात काम करताना मशागतीच्या वेळी येणाºया अडचणी लक्षात घेत पाऊस कमी झाल्यामुळे शेतात पेरणी केल्यानंतर तासांमध्ये खाडे किंवा बखया पडल्या आहेत, अशा जागेत पुन्हा रोप लावणे सोपे जावे म्हणून यंत्र बनविले.
या यंत्रामुळे तासांमध्ये एका ठिकाणी दोन किंवा तीन रोप असल्यास रोप मूळ व मातीसह उपटून पुन्हा जेथे खाडा पडला तेथे लावणे कमी वेळात व कमी परिश्रमात शक्य झाल्याचा दावा केला जात आहे. शेतकºयांची मेहनत व वेळ वाचविण्याºया यंत्राची परिसरात चर्चा होत असून, शेतकºयाचे कौतुक होत आहे.