शेतकरी मेटाकुटीस; फसवणूक करणारे मोकाट!
By admin | Published: February 22, 2016 02:22 AM2016-02-22T02:22:08+5:302016-02-22T02:22:08+5:30
वांझोटी केळी रोपे प्रकरण; कृषी विभाग, पोलिसांचा कानाडोळा का? शे तक-यांचा सवाल.
विजय शिंदे / आकोट (अकोला)
एकीकडे नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करीत अस ताना, दुसरीकडे मात्र केळीची वांझोटी रोपे देऊन शेतकर्यांची फसवणूक करणार्यांना शासकीय यंत्रणा रान मोकळे करून देत आहे. याप्रकरणी न्याय मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. फसवणूक करणार्या कंपन्या व संबंधितांना कोणाचे अभय आहे, कारवाईसाठी कृषी विभाग व पोलीस अनुत्सुक का आहेत, असे एका ना अनेक सवाल शे तकरी उपस्थित करीत आहेत. आंबोडा येथील १२ शेतकर्यांनी ८ फेब्रुवारी रोजी आकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामधील फसवणुकीची रक्कम कोटी रुपयां पर्यंंत पोहोचण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता, कृषी व पोलीस प्रशासनाने आतापर्यंंत कारवाई करणे आवश्यक होते, असे शे तकर्यांचे म्हणणे आहे.