कर्जमाफी नाही, पीक कर्जही मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 01:42 PM2019-06-24T13:42:06+5:302019-06-24T13:42:11+5:30
अकोला : कर्जमाफी मिळाली नाही आणि पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, जिल्ह्यातील थकबाकीदार ९७ हजार शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्जही मिळत नाही
- संतोष येलकर
अकोला : कर्जमाफी मिळाली नाही आणि पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, जिल्ह्यातील थकबाकीदार ९७ हजार शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्जही मिळत नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या थकबाकीदार शेतकºयांसमोर खरीप पेरणीचा खर्च भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार, ३१ मार्च २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. त्यानंतर २०१६-१७ या वर्षात बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ७५ हजार शेतकºयांना कर्जमाफी मिळाली नाही. कर्जमाफी मिळेल, या अपेक्षेने थकबाकीदार शेतकºयांकडून कर्जाची परतफेड करण्यात आली नाही आणि थकबाकीदार शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन शासनामार्फत अद्याप करण्यात आले नाही. यासोबतच २०१७-१८ या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांपैकी २२ हजार शेतकºयांकडून कर्जाची परतफेड करण्यात आली नसून, कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही आणि पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी संबंधित शेतकºयांकडून पुनर्गठनासाठी संबंधित बँकांना संमतीपत्र सादर करण्यात आले नाही. त्यामुळे २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांत पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ९७ हजार शेतकºयांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसून, पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, संबंधित थकबाकीदार शेतकºयांना यंदाच्या खरीप हंगामासाठी बँकांकडून पीक कर्ज मिळत नाही. दुष्काळी परिस्थितीत जवळ पैसा नाही आणि पीक कर्ज मिळत नाही, अशा परिस्थितीत तोंडावर आलेल्या खरीप पेरणीचा खर्च भागविणार तरी कसा, असा प्रश्न जिल्ह्यातील थकबाकीदार ९७ शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.
१.३१ लाख शेतकºयांना कर्जमाफी!
शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत ३१ मार्च २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार ३१० शेतकºयांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे; परंतु २०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या मात्र अद्याप थकबाकीदार असलेल्या ९७ हजार शेतकºयांना अद्याप कर्जमाफी मिळाली नसून, पीक कर्जाची रक्कम थकीत असल्याने, यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज मिळत नसल्याची स्थिती आहे.
पुनर्गठन केव्हा होणार?
२०१६-१७ या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन शासनामार्फत अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे थकबाकीदार शेतकरी नवीन पीक कर्जासाठी पात्र ठरू शकत नाहीत. त्यानुषंगाने नवीन पीक कर्ज मिळण्यासाठी शासनामार्फत पीक कर्जाचे पुनर्गठन केव्हा होणार, असा प्रश्न थकबाकीदार शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.