सातबारा मिळेना; शेतकऱ्यांना हेलपाटे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 02:15 PM2019-05-11T14:15:47+5:302019-05-11T14:16:09+5:30
अकोला : शासनाचे ‘महाभूलेख ’ संकेतस्थळ बंद असल्याने, जिल्ह्यात गत पंधरा दिवसांपासून ‘आॅनलाइन’ सात-बारा वितरण बंद आहे.
- संतोष येलकर
अकोला : शासनाचे ‘महाभूलेख ’ संकेतस्थळ बंद असल्याने, जिल्ह्यात गत पंधरा दिवसांपासून ‘आॅनलाइन’ सात-बारा वितरण बंद आहे. सात-बारा मिळत नसल्याने, शेतकºयांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत असून, सात-बाराअभावी शेतकºयांची कामे अडकली आहेत. त्यामुळे आॅनलाइन सात-बाराचे वितरण पूर्ववत केव्हा होणार, याबाबत प्रश्नचन्हि निर्माण झाले आहे.
शेती संबंधित विविध कामांसाठी शेतकºयांना लागणारा सात-बारा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सात-बारा उतारे संगणकीकृत करण्यात आले असून, आॅनलाइन सात-बाराचे वितरणही सुरू करण्यात आले; परंतु आॅनलाइन सात-बारा उपलब्ध होणाºया महाभूलेख या संकेतस्थळाच्या सर्व्हरवरमध्ये माहिती साठविण्याची क्षमता वाढविण्याचे काम सुरू असल्याने, गत पंधरा दिवसांपासून महाभूलेख संकेतस्थळ बंद आहे. त्यामुळे आॅनलाइन सात-बारा उतारा वितरणाचे काम पंधरा दिवसांपासून ठप्प झाले आहे. सात-बारा मिळत नसल्याने, शेतजमीन, प्लॉटसंबंधी सर्व कामे अडकली असून, सात-बारा प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत. त्यामुळे आॅनलाइन सात-बाराचे वितरण पूर्ववत केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तलाठ्यांकडे धाव
घेऊनही उपयोग नाही!
शासनाच्या ‘महाभूलेख ’ या संकेतस्थळावर आॅनलाइन सात-बारा उपलब्ध होत नसल्याने, सात-बारासाठी शेतकºयांना संबंधित तलाठ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे; परंतु महाभूलेख संकेतस्थळ बंद असल्याने, तलाठ्यांकडूनही सात-बारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे सात-बारासाठी नाहक हेलपाटे सहन करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.
सात-बाराअभावी अशी अडकली कामे!
आॅनलाइन सात-बारा उपलब्ध होत नसल्याने, जिल्ह्यात शेतजमीन, प्लॉटसंबंधी खरेदी-विक्री, खरीप पीक कर्र्ज, मालमत्तेची नोंद, फेरफार नोंद इत्यादी प्रकारची कामे अडकली आहेत.
जिल्ह्यात असे आहेत आॅनलाइन सात-बारा!
तालुका सात-बारा
अकोट ५३१२४
अकोला १०९५३५
तेल्हारा ४१२५६
पातूर ३१४३४
बार्शीटाकळी ३५५३२
बाळापूर ४७२१४
मूर्तिजापूर ३९६४३
...................................
एकूण ३५७७३८
सर्व्हरची क्षमता वाढविण्याचे काम सुरू असल्याने, महाभूलेख या संकेतस्थळाद्वारे आॅनलाइन सात-बारा वितरणाचे काम बंद आहे. सोमवारपासून, जिल्ह्यात आॅनलाइन सात-बारा वितरणाचे काम पूर्ववत सुरू होणार आहे.
-गजानन सुरंजे
उपजिल्हाधिकारी (महसूल).