शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यावसायिक व्हावे - कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 05:56 PM2019-08-02T17:56:58+5:302019-08-02T17:57:02+5:30
अकोला: शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जे विकले जाते तेच पिकवावे तद्वतच कंपनी चालवत असताना व्यवहारिक, व्यावसायिक दृष्टीकोण ठेवावा,तेव्हाच प्रगती साधता येईल असे आवाहन कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शुक्रवारी येथे केले.
अकोला: शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जे विकले जाते तेच पिकवावे तद्वतच कंपनी चालवत असताना व्यवहारिक, व्यावसायिक दृष्टीकोण ठेवावा,तेव्हाच प्रगती साधता येईल असे आवाहन कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शुक्रवारी येथे केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्यावतीने पश्चिम विदर्भातील शेतकरी उत्पादक कंपन्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी बोलताना डॉ. बोंडे यांनी विदर्भातील शेतकरी,कंपन्या,शसनाच्या विविध योजना आदी विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, मिनल अनिल बोेंडे यांची उपस्थिती होती. तसेच मंचावर डॉ.पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले,डॉ.विलास खर्चे,डॉ.दिलीप मानकर,डॉ.महेंद्र नागदेवे,डॉ.प्रकाश कडू,कार्यकारी परिषदेचे सदस्य गणेश कंडारकर,विनायक सरनाईक यांची उपस्थिती होती.
पश्चिम महाराष्टÑाचा आपण उदो-उदो करतो तथापि विदर्भाला १९६० पासून पाणीच मिळू दिले नाही.पाणीच नसल्याने ४५ अंश तापमानात येथील शेतकरी शेतात करणार काय?असा प्रश्न उपस्थित करताना आम्ही सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले आहेत. एवढेच नव्हे तर पूर्व विदर्भातून पश्चिम विदर्भात पाणी आणण्याची वैनंगगा ते पैनगंगा योजना राबविण्यात येणार आहे.एवढेच नव्हे तर पश्चिम वाहिन्यांचे जे पाणी समुद्राला मिळते ते पाणी मराठवाड्यात आणण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.मागील सरकारच्या काळातील ५२ हजार कोटींच्या कर्जाचा फायदा हा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच झाल्याची टिका करताना आम्ही मात्र संपूर्ण राज्याचा विचार करू न कर्जमाफी केल्याचे ते म्हणाले.हे सरकार शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, विविध योजना उद्योगासाठी मिळणारे अनुदान कर्जात वळते करू नये,यासाठीचे माझे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
पोहरे यांनी विदर्भात नियोजन नसल्याने येथील एक लाख कोटी रू पये दरवर्षी विदर्भाबाहेर जात आहेत.पश्चिम महाराष्टÑातील यशाच गमक समजून आपल्या शेतकºयांना वाटचाल करावी लागणार आहे.त्यांची देशी कापूस सोडून आपण एच-४,बीटी च्या मागे लागल्याने शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत आता तर एचटीबीटी कापसाच्या माध्यमातून शेतकºयांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. मिनल बोंडे यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या निर्मितीकरीता आर्थिक नियोजन पध्दती या विषयावर तर डॉ. भाले यांनी कृषी विद्यापीठाने केलेल्या प्रगतीची माहिती दिली.संचालन डॉ.प्रदीप बोरकर यांनी केले.