श्रमदानातून शेतकऱ्यांनी बनविला शेतरस्ता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:17 AM2021-05-30T04:17:08+5:302021-05-30T04:17:08+5:30

संतोषकुमार गवई पातूर : तालुक्यातील भंडारज बु. येथील २५ शेतकऱ्यांनी पुढाकार घेत ट्रॅक्टरच्या सहाय्याने एक किमी. लांबीचा शेतरस्ता श्रमदानातून ...

Farmer road built by farmers through hard work! | श्रमदानातून शेतकऱ्यांनी बनविला शेतरस्ता !

श्रमदानातून शेतकऱ्यांनी बनविला शेतरस्ता !

Next

संतोषकुमार गवई

पातूर : तालुक्यातील भंडारज बु. येथील २५ शेतकऱ्यांनी पुढाकार घेत ट्रॅक्टरच्या सहाय्याने एक किमी. लांबीचा शेतरस्ता श्रमदानातून तयार केला आहे. ‘माझी शेती, माझा शेतरस्ता ’ या भावनेतून शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीची वाट न पाहता शेत रस्त्याचे काम पूर्ण केले. या शेत रस्त्यामुळे जवळपास या शेत रस्त्यावर अवलंबून असणाऱ्या १५० शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

तालुक्यातील भंडाराज बुद्रूक येथील शेत रस्त्याच्या कडेला जवळपास २५० एकर शेती आहे. पावसाळा सुरू होताच या रस्त्यावरून चालणे कठीण होते. पेरणीसाठी बैलगाडी घेऊन जाण्यासाठी कसरत करावी लागते. त्यानंतर शेतातून शेतमाल घरी आणणे कठीण होते. त्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी माजी सरपंच दीपक इंगळे यांची भेट घेतली. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी शेतकरी गोळा करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने जवळपास १ किमी. अंतराचा शेतरस्ता श्रमदानातून तयार केला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (फोटो)

-------------------------

‘माझी शेती, माझा शेतरस्ता ’ उपक्रम

पातूर तालुक्यात शेत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, शेतकऱ्यांचे हाल होत आहे. या शेत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शेतकरी शासकीय कार्यालयात चकरा मारीत असल्याचे चित्र आहे. मात्र भंडारज येथील शेतकऱ्यांनी ‘माझी शेती, माझा शेतरस्ता ’ हा उपक्रम राबवून शेतरस्ता पूर्ण केला. शेत रस्त्यावर टाकण्यासाठी लागणारा मुरूम ट्रॅक्टरद्वारे शेतकऱ्यांच्या विहीर खोदकामातून आणण्यात आला आहे.

-------------------

या शेतकऱ्यांनी घेतले परिश्रम

माजी सरपंच दीपक इंगळे यांच्या नेतृत्वात निळकंठ इंगळे, उत्तम निखाडे, बाबूलाल सुरवाडे, संघपाल इंगळे, प्रकाश इंगळे, भीमराव निखाडे, सुभाष सुरवाडे, विनोद शिरसाट राजकुमार इंगळे, गुड्डू शेंडे, संतोष इंगळे राजेंद्र सुरवाडे श्रीकृष्ण देवराव इंगळे यांच्यासह २५ शेतकऱ्यांनी श्रमदान केले. तसेच विहिरीवरून मुरुम आणण्यासाठी विकास ठाकरे, विवेक इंगळे, मंगेश इंगळे, अमानकर, छोटू अमानकर, कमलेश इंगळे, शेषराव सुरवाडे, पंजाब सुरवाडे, दत्ता घेघाटे, दिनकर भांगे आदींनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला.

Web Title: Farmer road built by farmers through hard work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.