कर्जाला कंटाळून शेतक-याने केले आत्मदहन
By admin | Published: June 10, 2017 02:38 AM2017-06-10T02:38:36+5:302017-06-10T02:38:36+5:30
सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाला कंटाळून गजानन वाडी येथील ५५ वर्षीय अल्पभूधारक शेतक-याने स्वत:स जाळून घेऊन आत्महत्या केली
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडेगाव (जि. अकोला): सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाला कंटाळून गजानन वाडी येथील ५५ वर्षीय अल्पभूधारक शेतकर्याने स्वत:स जाळून घेऊन आत्महत्या केली. ही घटना ९ जून रोजी घडली.
गजानन वाडी येथील सुरेश जगदेव काळे यांच्यावर बँकेचे तसेच काही खासगी साहुकारांचे कर्ज होते. गत काही वर्षांपासून त्यांच्या दोन एकर शेतीमध्ये अपेक्षित उत्पन्न होत नसल्यामुळे सुरेश काळे हे चिंताग्रस्त होते. कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी शुक्रवारी सकाळी ८ वाजता जाळून घे तले. त्यांना तातडीने अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उ पचारादरम्यान त्यांचा दुपारी ३ वाजता मृत्यू झाला. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, पत्नी व आप्त परिवार आहे.