बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 06:31 PM2018-09-29T18:31:14+5:302018-09-29T18:32:10+5:30
पातूर (अकोला): पातूर-बाळापूर रस्त्यावर असलेल्या शेतात पिकाला पाणी देत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली.
पातूर (अकोला): पातूर-बाळापूर रस्त्यावर असलेल्या शेतात पिकाला पाणी देत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. या हल्ल्यात शेतक री गंभीर जखमी झाला. शेख मोबीन शेख इमाम (४०) रा. मुजावरपुरा पातूर असे जखमी शेतकºयाचे नाव आहे. मजूर महिलांनी आरडाओरड केल्याने शेख मोबीन यांचे प्राण वाचले.
पातुरातील मुजावरपुरा येथील शेतकरी शेख मोबीन शेख इमाम (४०) यांचे पातूर-बाळापूर रोडवरील सिंगर नाल्याजवळ शेत आहे. या शेतामध्ये ते सकाळी ८ ते ९ वाजताच्या दरम्यान कपाशीला पाणी देत होते, तसेच ३ ते ४ महिला शेतात काम करीत होत्या. यावेळी अचानक आलेल्या बिबट्याने त्यांच्या अंगावर धाव घेतली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या महिला मजुरांनी आरडाओरड केल्याने बिबट तेथून पळून गेला. यावेळी बिबट्याचा पंजा लागल्याने शेख मोबीन हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने पातूर प्राथमिक आराग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर वन विभागाच्या वाहनाने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा हैदोस सुरू आहे. शेतकºयांवर हल्ला केल्याने मजूरही काम करण्यासाठी शेतात जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांसह शेतमजुरांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)