शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 06:05 PM2019-07-26T18:05:32+5:302019-07-26T18:05:47+5:30
सायखेड (अकोला): सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून बार्शीटाकळी तालुक्यातील साखरवीरा येथील ५५ वर्षीय शेतकºयाने विष प्राशन आत्महत्या केली.
सायखेड (अकोला): सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून बार्शीटाकळी तालुक्यातील साखरवीरा येथील ५५ वर्षीय शेतकºयाने विष प्राशन आत्महत्या केली. त्र्यंबक बालू राठोड असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.
साखरवीरा येथील त्र्यंबक राठोड यांच्याकडे दोन एकर शेती आहे. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महान शाखेतून एक लाख रुपयांचे कर्ज काढले होते. तसेच अकोल्यातील एका नामांकीत फायनान्स कंपनीकडूनही १ लाख २० हजार रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. त्यांना गेल्या काही वर्षांपासून शेतीत अपेक्षीत उत्पन्न झाले नाही. त्यामुळे, हे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते राहत होते. अशातच त्यांच्या पत्नीला किडणीचा आजार जडल्याने त्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली. या चिंतेततच त्यांनी २५ जुलै रोजी विष प्राशन केले. त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली व आप्त परिवार आहे. (वार्ताहर)