कर्जबाजारीपणामुळे शेतक-याची आत्महत्या

By admin | Published: June 24, 2015 02:01 AM2015-06-24T02:01:14+5:302015-06-24T02:01:14+5:30

विषारी औषध केले प्राशन.

Farmer suicides due to debt waiver | कर्जबाजारीपणामुळे शेतक-याची आत्महत्या

कर्जबाजारीपणामुळे शेतक-याची आत्महत्या

Next

मळसूर (जि. अकोला): सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे अकोला जिल्ह्यातील मळसूर येथील शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उजेडात आली. अरविंद रामभाऊ काळे (६0) हे जीवन संपविलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांच्याकडे ६ एकर शेती होती. दिवसभर ते शेतात राबले. बराच वेळ झाल्याने ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. ते झाडाखाली पडल्याचे दिसून आले. त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Farmer suicides due to debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.