शेतकरी आत्महत्या: उपाययोजनांची हवी प्रभावी अंमलबजावणी
By admin | Published: August 6, 2015 01:16 AM2015-08-06T01:16:34+5:302015-08-06T01:16:34+5:30
‘लोकमत’ परिचर्चेत उमटला सूर.
अकोला: शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीच्या कार्यक्रमात विविध विभागामार्फत उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय योग्य असला तरी, या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची खरी गरज आहे, असा सूर बुधवारी लोकमतच्यावतीने आयोजित परिचर्चेत उमटला. परिचर्चेत निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, शिवाजीराव देशमुख, मनोज तायडे, डॉ.दीपक केळकर यांनी विचार मांडले. राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय २४ जुलै रोजी शासनामार्फत घेण्यात आला आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी हा निर्णय योग्य आहे; मात्र त्यासाठी उपाययोजनांची काटेकार अंमलबजावणी झाली तर शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होईल. तसेच शेतकर्यांसाठी पीक विमा योजना प्रभावीरीत्या राबविण्याची गरज असल्याचे विचारही मान्यवरांनी मांडले.