नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Published: May 1, 2017 02:42 AM2017-05-01T02:42:31+5:302017-05-01T02:42:31+5:30

अकोला : तरोडा येथील अल्पभूधारक शेतकरी देवीदास रामराव साबळे (६५) यांनी सततच्या नापिकीला कंटाळून राहत्या घरी २७ एप्रिलला दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Farmer suicides with tainted nuptials | नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Next

अकोला : नीळकंठ सहकारी सूतगिरणी येथील सेवानिवृत्त कामगार तथा तरोडा येथील अल्पभूधारक शेतकरी देवीदास रामराव साबळे (६५) यांनी सततच्या नापिकीला कंटाळून राहत्या घरी २७ एप्रिलला दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. साबळे यांची तरोडा या गावी तीन एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीवर त्यांनी काढलेल्या कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच होता. कर्जमाफीच्या आशेवर ते जीवन जगत होते. शेतीतील होणाऱ्या नापिकीमुळे त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत होता. सततच्या होणाऱ्या नापिकीमुळे ते आपल्या वरील कर्ज फेडण्यास असमर्थ ठरत होते. कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा बराच मोठा आहे.

Web Title: Farmer suicides with tainted nuptials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.