मृदा दिनानिमित्त सोनखेड येथे शेतकरी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:13 AM2020-12-07T04:13:09+5:302020-12-07T04:13:09+5:30
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री हाडोळे यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने असलेले मातीचे महत्व विशद करून उपस्थितांना आवाहन केले की मातीचे संवर्धन ...
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री हाडोळे यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने असलेले मातीचे महत्व विशद करून उपस्थितांना आवाहन केले की मातीचे संवर्धन एक विश्वस्त म्हणून करून पुढील पिढीकडे एक समृद्ध वारसा सुपूर्द करावा. त्यांनी पीकवाढीसाठी आवश्यक असलेल्या विविध घटकांचे मातीतील जीवजंतू मुळे पिकाला कसे उपलब्ध होते हे शेतकऱ्यांना समजून सांगितले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे यांनी मातीतील सेंद्रिय पदार्थाचे घटते प्रमाण चिंताजनक असल्याचे नमूद करून शेतकऱ्यांना कंपोस्ट खत, गांडूळ खत, नाडेप तंत्रज्ञानाने तयार झालेले खत इत्यादींचा वापर करण्याचे आवाहन केले. पुढे बोलताना त्यांनी सूक्ष्म मूलद्रव्यांचे महत्त्व विशद करताना सल्फरचा वापराचे महत्व कापूस, सोयाबीन या पिकांच्या बाबतीत कसे कार्य करते हे समजावून सांगितले. प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप करताना मंडळ कृषी अधिकारी उमेश कदम यांनी शेतकरी आपल्या पुढील पिढीला केवळ जमीन न देता पिकाचे उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गुण संपन्न मृदेची शेती देतील. कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहायक चोपडे, बोचरे यांनी केले.
फोटो: