शेतकऱ्यांच्या ६० हजार कर्जखात्यांची होणार पडताळणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:04 PM2018-09-12T12:04:48+5:302018-09-12T12:08:19+5:30
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जखात्यांच्या माहितीत त्रुटी आढळून आलेल्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अकोला व वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांच्या ६० हजार १८५ कर्जखात्यांची पडताळणी करण्यात येणार आहे.
- संतोष येलकर
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जखात्यांच्या माहितीत त्रुटी आढळून आलेल्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अकोला व वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांच्या ६० हजार १८५ कर्जखात्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाच्या महाआॅनलाइन विभागामार्फत दोन्ही जिल्ह्यातील कर्जखात्यांच्या याद्या सोमवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पाठविण्यात आल्या आहेत.
कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकºयांच्या कर्जखात्यांची माहिती राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत शासनाच्या महाआॅनलाइन विभागाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आली होती. त्यामध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यातील शेतकºयांच्या ६० हजार १८५ कर्जखात्यांच्या माहितीत त्रुटी आढळून आल्या. त्यामध्ये बँकेचे नाव, गावाचे नाव, बँकेचा आयएफएससी कोड नंबर, आधार क्रमांक इत्यादी प्रकारच्या त्रुटींचा समावेश आहे. त्रुटी आढळून आलेल्या शेतकºयांच्या ६० हजार १८५ कर्जखात्यांच्या याद्या शासनाच्या महाआॅनलाइन विभागामार्फत अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्यानुसार अकोला व वाशिम जिल्ह्यातील संबंधित कर्जखात्यांची पडताळणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेडून करण्यात येणार असून, पडताळणीनंतर या कर्जखात्यांची माहिती बँकेमार्फत तालुकास्तरीय समित्यांकडे पाठविण्यात येणार आहे. या कर्जखात्यांपैकी कर्जमाफीसाठी पात्र आणि अपात्र ठरणाºया कर्जखात्यांचा निर्णय तालुकास्तरीय समित्यांमार्फत घेण्यात येणार आहे. त्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र ठरणाºया शेतकºयांची माहिती शासनाच्या महाआॅनलाइन विभागाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात येणार आहे.
अकोला जिल्ह्यात १.१७ लाख
शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ!
शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात गतवर्षी आॅनलाइन अर्ज भरलेल्या १ लाख ३८ हजार शेतकºयांपैकी ११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ८५३ शेतकºयांना ४९७ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.
कर्जमाफी योजनेंतर्गत सादर करण्यात आलेल्या कर्जखात्यांच्या माहितीमध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत अकोला व वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांच्या ६० हजार १४५ कर्जखात्यांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्रुटी असलेल्या कर्जखात्यांच्या याद्या पडताळणीसाठी शासनाच्या महाआॅनलाइन विभागामार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पाठविण्यात आल्या असून, संबंधित कर्जखात्यांची पडताळणी बँकेमार्फत करण्यात येणार आहे.
- जी.जी. मावळे
जिल्हा उपनिबंधक