शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवादातूनच शेतीची प्रगती - कुलगुरू दाणी खरीप हंगामपूर्व मेळाव्याला वर्‍हाडातील शेतकर्‍यांचा प्रतिसाद

By admin | Published: May 20, 2014 06:48 PM2014-05-20T18:48:38+5:302014-05-20T19:49:47+5:30

शेतकरी-कृषी शास्त्रज्ञांच्या संवादातूनच शेतीच्या प्रगतीकडे वाटचाल करता येणार असून, प्रगतिशील शेतकर्‍यांनी कृषी तंत्रज्ञान व स्वत:च्या अनुभवाची सांगड घालून शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी.दाणी यांनी केले.

Farmer's advancement through advocacy and education - VC's response to Kharif season before Kharif | शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवादातूनच शेतीची प्रगती - कुलगुरू दाणी खरीप हंगामपूर्व मेळाव्याला वर्‍हाडातील शेतकर्‍यांचा प्रतिसाद

शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवादातूनच शेतीची प्रगती - कुलगुरू दाणी खरीप हंगामपूर्व मेळाव्याला वर्‍हाडातील शेतकर्‍यांचा प्रतिसाद

Next

अकोला : शेतकरी-कृषी शास्त्रज्ञांच्या संवादातूनच शेतीच्या प्रगतीकडे वाटचाल करता येणार असून, प्रगतिशील शेतकर्‍यांनी कृषी तंत्रज्ञान व स्वत:च्या अनुभवाची सांगड घालून शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी.दाणी यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात मंगळवार २० मे रोजी आयोजित खरीप हंगामपूर्व कृषी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. दाणी बोलते होते.
मेळाव्याला संशोधन संचालक डॉ. प्रदीप इंगोले, शिक्षण विस्तार संचालक डॉ. विजय माहोरकर, डॉ. एम.व्ही. भाले, डॉ. सी.एन. गांगडे, प्रगतिशील शेतकरी पंढरी बनकर,कुलदीप राऊत, किशोर बलखंडे,शिक्षण विस्तार संचालनालयाचेप्रमुख संपादक डॉ.प्रमोद वाळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. दाणी यांनी शेतकरीच कृषी विद्यापीठाचा मार्गदर्शक व संदेशवाहक असल्याचे सांगितले. कृषी विद्यापीठ निर्मित संशोधन तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकर्‍यांनी करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. येत्या खरीप हंगामात शेतकर्‍यांनी किडीबाबत खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्याकरिता पिकावर नवीन कीड दिसताच शेतकर्‍यांनी विलंब न करता, कृषी विद्यापीठांच्या कीटकशास्त्र विभागाशी संपर्क साधावा म्हणजे संभाव्य नुकसान टाळता येईल, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शेतकर्‍यांनी शेतीत केलेले प्रयोग सादर केले. शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमात शेतकर्‍यांच्या अनेक प्रश्नाची उत्तरे कृषी शास्त्रज्ञांनी दिली. तांत्रिक सत्रात विविध पीक व पेरणीची माहिती कृषी शास्त्रज्ञांनी शेतकर्‍यांना दिली. या मेळाव्याच्या ठिकाणी कृषी विद्यापीठाचे ५० क्विंटल सोयाबीन बियाणे शेतकर्‍यांनी खरेदी केले. तारा तूर, मूग व भाजीपाले बियाणे, निविष्ठा, प्रकाशने विक्रीसाठी ठेवले होते. शेतकर्‍यांनी या सर्वच साहित्य बियाण्यांची खरेदी केली. कृषी विद्यापीठाची १० ते १२ क्विंटल तारा तूर शेतकर्‍यांनी खरेदी केली.

-आंतरराष्ट्रीय शेती सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन
विदर्भ व पाश्चिमात्य शेतकर्‍यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी येत्या ४ ते १० डिसंेबर रोजी आंतरराष्ट्रीय शेती सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत असल्याची घोषणा कुलगुरू डॉ. दाणी यांनी या मेळाव्यात केली. पाश्चिमात्य शेतीतील प्रयोग विदर्भातील शेतकर्‍यांना माहिती व्हावेत, यासाठी हे प्रयत्न केले जात असल्याचे डॉ. दाणी यांनी सांगितले.

Web Title: Farmer's advancement through advocacy and education - VC's response to Kharif season before Kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.