बोंडअळीच्या मदतीसाठी शेतकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 02:00 AM2018-03-07T02:00:04+5:302018-03-07T02:00:04+5:30
मूर्तिजापूर : कपाशी पिकावरील बोंडअळीग्रस्तांमधून तालुक्यातील मूर्तिजापूरसह लाखपुरी व कुरूम ही महसूल मंडळेच वगळण्यात आल्याने शेतक-यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. वगळण्यात आलेल्या मंडळातील शेतकºयांना ही मदत मिळावी, या मागणीसाठी शेतकºयांनी तहसीलदार राहुल तायडे यांना निवेदन सादर करून मदतीची मागणी केली आहे, अन्यथा १० दिवसांनंतर शेतकरी उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : कपाशी पिकावरील बोंडअळीग्रस्तांमधून तालुक्यातील मूर्तिजापूरसह लाखपुरी व कुरूम ही महसूल मंडळेच वगळण्यात आल्याने शेतक-यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. वगळण्यात आलेल्या मंडळातील शेतकºयांना ही मदत मिळावी, या मागणीसाठी शेतकºयांनी तहसीलदार राहुल तायडे यांना निवेदन सादर करून मदतीची मागणी केली आहे, अन्यथा १० दिवसांनंतर शेतकरी उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी, शेलुबाजार, निंभा, कुरूम ही मंडळे बोंडअळीच्या मदतीपासून का वगळण्यात आली आहेत. आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात ज्या शेतक-यांनी बोंडअळीच्या नुकसानासाठी तक्रारी दाखल केल्या होत्या त्यांच्या शेतामध्ये मंडळ अधिकारी, कृषी सहायकांनी पाहणी केली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती व तालुकास्तरीय समिती यांनी नुकसानग्रस्त प्रत्येक झाडांची १०० बोंड्यांपैकी ७०/८० बोंड्या नुकसानग्रस्त असल्याची त्यांनी पाहणी केली. पालकमंत्री रणजित पाटील यांनी जांभा खु. व शेलुबोंडे येथील नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतावर स्वत: पाहणी केली. खासदार संजय धोत्रे यांनी पुंडलिक नगर येथील विवेक पातोंड यांच्या शेतावर जावून बोंडअळीची पाहणी केली. सर्वांनी पाहणी केल्यानंतर जिल्हास्तरीय पाहणी आली.
त्यामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा परिषद कृषी अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांच्या समितीने नुकसानग्रस्त बोडंअळीच्या कपाशीची पाहणी करून ही कपाशी तत्काळ काढून शेत मोकळे करा, असे प्रत्येक शेतकºयांना सांगितले. शेतकºयांमधील रोष पाहता नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत जाहीर न झाल्यास शहीद धर्मा पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नैसर्गिक संकटाच्या मालिकेने आधीच शेतकरी हतबल झाला आहे; मात्र त्याच्या विषयी कुठलेही धोरण न आखता शासन त्याची क्रूर थट्टा करीत आहे. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे.
यावर्षी बोंडअळीच्या कहराने कापूस बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाºया या भागातील कापूस पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. त्या भागाचा पालकमंत्री रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार हरीश पिंपळे व जनप्रतिनिधीने दौरे करून पाहणीदेखील करून सर्वेक्षणाचे आदेश देण्यात यावे.
यावेळी ९०/ १०० कापसाची बोंडे कपाशीला होती; मात्र त्यामध्ये बोंडअळीचा शिरकाव झाल्याने शेतकºयांनी छातीवर दगड ठेवून हिरव्या पिकांवर नांगर फिरविला. तरीही कपाशीवरील बोंडअळीग्रस्त मूर्तिजापूर, लाखपुरी व कुरूम या महसूल मंडळातील नुकसानग्रस्त शेतकºयांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. आता मात्र शेतकºयांचे हे शेवटचे पत्र आहे. चुकीचा अहवाल तत्काळ दुरूस्त करून शेतकºयांना जर मदत पोहोचली नाही तर शेतकरी जो मार्ग अनुसरील व त्यामधून मोठा अनर्थ घडल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असाही इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू साहेबराव वानखडे, कैलास साबळे, मुन्ना नाईकनवरे, प्रा.गौरखेडे, हरनामसिंह बाजहिरे, सुनील काळे, संजय पखाले, मुन्ना पाटील, आनंद खंडारे, संदीप मानकर, संजय गावंडे, रमेश गोळंबे, बी़ पी़ कावरे, प्रभाकर गावंडे, प्रकाश गावंडे, प्रकाश मुळे, देवीदास बांगड,अरूण बोंडे, शरद बंग, बालु टांक, माधव काळे, नितीन गावंडे, श्रीकांत वानखडे, शंकर मोरे आदींच्या स्वाक्षरी निवेदनावर आहेत.
शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यात बोंडअळीमुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शासनाने मदतीसाठी दुजाभाव न करता सरसकट मदत द्यावी,अन्यथा शिवसेना आपल्या स्टाइलने आंदोलन करेल, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख अप्पूदादा तिडके यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.तालुक्यातील अंतर्गत येणारे मंडळे या मदतीत समाविष्ट करा, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अप्पू तिडके, अॅड. शरद भटकर, वैद्यकीय सेल तालुकाप्रमुख डॉ. पंकज राऊत, शिवा गव्हाणे, रुपेश कडू, मनोज जावरकर, ऋषिकेश देशमुख, रामेश्वर जामनीकर, हेमंत पाटील, ऋषिकेश डिके, मनोज गायकवाड, अंगत पाटील व इतर कार्यकर्त्यांनी केली आहे.