वानच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; तेल्हाऱ्यात काढला बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 03:13 PM2019-09-14T15:13:28+5:302019-09-14T15:14:06+5:30
हजारो शेतकºयांनी शनिवार, १४ सप्टेंबर तहसिल कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला.
तेल्हारा : तालुक्यातील वान धरणाचे पाणी अकोला शहरासाठी आरक्षीत करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो शेतकºयांनी शनिवार, १४ सप्टेंबर तहसिल कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. आदेश रद्द न केल्यास यापेक्षाही उग्र आंदोलनाचा इशारा शेतकºयांनी दिला.
शेतकरी बांधवांच्या हक्काचे वाण धरणाचे पाणी अकोला शहरासाठी शासनाने आरक्षित करुण हजारो हेक्टर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील ५४ गावातील वानप्रकल्प लाभ धारक शेतकरी बांधवांनी संतप्त होउन आंदोलनाची दिशा ठरवली. गावागावातिल शेतकºयांनी १० सप्टेंबरला आकोट विधानसभा मतदारसंघ कडकडित बंद केला. यावर शेतकºयांना सहानुभूति न दाखवता आमदार भारसाकळे यांनी वृत्तपत्रातुन शेतकºयांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करून तेल्हारा शहरासत गावांमधील शेतकºयांनी शनिवारी बैलगाडी मोर्र्चा काढला. आठवडी बाजार येथून सुरु झालेला मोर्चा जूने शहर, पोलिस स्टेशन मार्गे टावर चौक ते तहसील कार्यालय येथे धडकला. ‘पाणी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या मालकीचे’ या मुख्य नाºयासह पारंपरिक ढोलाच्या भजनातुन नारे देऊन निषेध दर्शविण्यात आला. तसेच ‘गणपती बाप्पा शासनाला बुद्धि दे’ अशा आशयाचे देखावे लक्ष वेधून घेत होती. तहसील कार्यालयात मोर्चा दाखल झाल्यानंतर उपस्थित हजारो शेतकºयांच्या सह्यांचे निवेदन तेल्हारा तहसिलचे नायब तहसीलदार विजय सुरळकर यांना देण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाने ४० वषार्पूर्वी शेतकर्याच्या विविध मागण्यासंदर्भात भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर आज निघालेला भव्य मोर्चा हे त्याची पुनरावृत्ति असल्याचे ज्येष्ट शेत्कयार्नी सांगितले. यावेळी सवार्नुमते पुढील आंदोलनाची दिशा ठरवून १९ सप्टेम्बर पासून तहसील कार्यालयावर साकळी उपोषण व गावोगावत विविध प्रकारचे आंदोलन करण्याचा निर्णय करण्यात आला. तेल्हारा पोलिस स्टेशनचे ठानेदार विकास देवरे यांच्या मगार्दार्शनात चोख पोलिस बंदोबस्त होता. शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी शेतकर्यांसाठी चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.