‘आॅफलाईन’ अर्ज करणारे शेतकरी पीक विम्यापासून वंचीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 06:22 PM2018-11-11T18:22:13+5:302018-11-11T18:22:21+5:30
अकोला : पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात पीक विम्याचे ‘आॅफलाइन’ अर्ज सादर करणारे जिल्ह्यातील ६ हजार ५९१ शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचीतच आहेत.
अकोला : पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात पीक विम्याचे ‘आॅफलाइन’ अर्ज सादर करणारे जिल्ह्यातील ६ हजार ५९१ शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचीतच आहेत. त्यामुळे आॅफलाईन पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा काढण्यासाठी ‘आॅनलाइन’ अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर, शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील शेतकºयांचे ‘आॅफलाइन’ अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातील ६ हजार ५९१ शेतकºयांनी पीक विम्यासाठी आॅफलाइन अर्ज सादर केले होते. आॅफलाइन अर्ज सादर केलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आली; परंतु वर्ष उलटून गेले तरी, गतवर्षी आॅफलाइन अर्ज केलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना पीक विम्याचा लाभ अद्यापही मिळाला नाही. त्यामुळे आॅफलाइन अर्ज केलेल्या शेतकºयांना पीक विमा रक्कमेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पीक विम्याच्या प्रतीक्षेत असे आहेत शेतकरी!
/>तालुका शेतकरी
अकोला ११७३
अकोट १६५९
तेल्हारा ७६०
बाळापूर ६६९
पातूर ११४३
बार्शीटाकळी ७४६
...............................................
एकूण ६५९१