‘थंब इम्प्रेशन’ येत नसल्याने शेतकरी झाले त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 07:59 PM2017-09-06T19:59:57+5:302017-09-06T20:00:03+5:30

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे अर्ज  भरण्यासाठी माझोड येथील महा ई-सेवा केंद्रात  रविवारच्या रात्री १ वाजेपर्यंत भरतपूर येथील दुर्गा  जगन्नाथ खंडारे या महिलेच्या सर्व बोटांचे ठसे घे तल्यानंतरही ते आले नाही. म्हणून या महिलेने  रागात आपल्या पतीच्या डोक्यात अंगठा घासणे  सुरू केले. कदाचित असे केल्याने अंगठा येईल,  असे या महिलेला वाटले; परंतु तरीही अंगठा काही  आला नाही. अंगठा न येण्याची तांत्रिक अडचण  काही स्त्री-पुरुषांच्या बाबतीत घडत आहे. त्याच प्रमाणे मयत खातेदारांचे अर्ज कसे भरावे, हासुद्धा  प्रश्न आहे. 

The farmers are suffering due to 'thumb impression' | ‘थंब इम्प्रेशन’ येत नसल्याने शेतकरी झाले त्रस्त

‘थंब इम्प्रेशन’ येत नसल्याने शेतकरी झाले त्रस्त

Next
ठळक मुद्देमयत खातेदारांचे अर्ज कसे भरावेवारसांना पडला प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क
माझोड : शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे अर्ज  भरण्यासाठी माझोड येथील महा ई-सेवा केंद्रात  रविवारच्या रात्री १ वाजेपर्यंत भरतपूर येथील दुर्गा  जगन्नाथ खंडारे या महिलेच्या सर्व बोटांचे ठसे घे तल्यानंतरही ते आले नाही. म्हणून या महिलेने  रागात आपल्या पतीच्या डोक्यात अंगठा घासणे  सुरू केले. कदाचित असे केल्याने अंगठा येईल,  असे या महिलेला वाटले; परंतु तरीही अंगठा काही  आला नाही. अंगठा न येण्याची तांत्रिक अडचण  काही स्त्री-पुरुषांच्या बाबतीत घडत आहे. त्याच प्रमाणे मयत खातेदारांचे अर्ज कसे भरावे, हासुद्धा  प्रश्न आहे. 
रात्रंदिवस शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे फॉर्म  भरण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या  शिष्यवृत्तीचे फॉर्म, विद्युत बिल भरणा, इतर प्रमाण पत्रे कधी काढावी, हा प्रश्नसुद्धा निर्माण झाला आहे.  दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी  आस्तिककुमार पांडेय, उपविभागीय अधिकारी प्रा.  संजय खडसे यांच्या मार्गदर्शनात तलाठी, मंडळ  अधिकारी प्रत्येक सेतू केंद्रावर लक्ष ठेवून आहेत.  कापशीचे मंडळ अधिकारी सावदेकर, तलाठी ज्यो ती कराळे या माझोड महा ई-सेवा केंद्रात सोमवारी  ठाण मांडून बसले होते. यावेळी महा ई-सेवा  केंद्राच्यावतीने प्रत्येकाला चहा देण्यात येत होता.  प्रसंगी मंडळ अधिकारी व तलाठय़ाने कामकाज  समजून घेतले. यावेळी अधिकार्‍यांनी येऊन  मार्गदर्शन केले. 

Web Title: The farmers are suffering due to 'thumb impression'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.