शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी कटिबद्ध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:23 AM2021-09-06T04:23:30+5:302021-09-06T04:23:30+5:30
शेतकरी संघटनेची तीन दिवसीय संयुक्त कार्यकारिणी दि. ३ सप्टेंबरपासून आयोजित केली होती. या बैठकीत राज्यभरातून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सहभागी ...
शेतकरी संघटनेची तीन दिवसीय संयुक्त कार्यकारिणी दि. ३ सप्टेंबरपासून आयोजित केली होती. या बैठकीत राज्यभरातून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. तीन दिवसीय संयुक्त कार्यकारिणीचा समारोप दि. ५ रोजी करण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार वामनराव चटप, मा. आ. सरोज काशीकर, ॲड. दिनेश शर्मा, अनिल घनवट यांनी कार्यकारिणीस मार्गदर्शन केले.
‘लक्ष्मीमुक्तीचे आंदोलन पुन्हा सुरू करणार !’
महिलांना मालमत्ते सहभागी करून घेण्यासाठी लक्ष्मीमुक्तीचे आंदोलन पुन्हा सुरू करणार असल्याची घाेषणा ललित बहाळे यांनी केली.
- - शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा बहाळे यांच्या खांद्यावर
यामध्ये शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ललित बहाळे यांची नियुक्ती करण्यात आली. महिला आघाडीच्या अध्यक्षपदी प्रज्ञा बापट, तर शेतकरी संघटना युवा आघाडीच्या अध्यक्षपदी सुधीर बिंदू यांची निवड करण्यात आली, तर अकोला जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्षपदी लक्ष्मीकांत कौठकर यांची निवड करण्यात आली.
-----------------------
- स्वतंत्र भारतच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी घनवट
अकाेट येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय शेतकरी संघटनेच्या संयुक्त कार्यकारिणीच्या सभेत स्वतंत्र भारत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अनिल घनवट यांची, तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी मधुसुदन हरणे यांची नियुक्ती करण्यात आली.