परतीच्या पावसाने शेतकर्यांची उडाली दाणादाण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 07:45 PM2017-10-11T19:45:11+5:302017-10-11T19:46:38+5:30
मूर्तिजापूर : सद्यस्थितीत परतीच्या पावसाने तालुक्यातील शे तकर्यांना नाकीनऊ आले असून, सर्व शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनेक भागात परतीच्या पावसामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती दिसून येत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतातील उभी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

मूर्तिजापूर तालुक्यात यंदा शेतकर्यांनी सोयाबीन, मूग, उडीद, कापूस अशा पिकांची पेरणी केलेली आहे. यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर दिसून आला, तसेच यंदा मालालाही पाहिजे त्या प्रमाणात भाव नाही. त्यातच दिवाळीचा सण अवघ्या एका आठवड्यावर आला आहे. अनेक शे तकर्यांनी मिळेल त्या भावात माल विकला. त्यातच नोटाबंदी, भारनियमनामुळे शेतकर्यांना पिकाला पाणी देता न आल्याने जेमतेम उत्पन्न मिळाले. मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यात आजही बर्याच शेतकर्यांचा माल शेतातच पडलेला आहे. संततधार पर तीच्या पावसामुळे कापून शेतात ठेवलेला माल खराब होण्याच्या स्थितीत आहे. उडीद, मूग, कापूस याची परिस्थिती फारच बिकट आहे. सर्वसामान्यांचे ‘अच्छे दिन’ येतील, असा गवगवा करून प्रसिद्धी मिळविणार्या शासनाने केवळ शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम केले आहे. त्यांना अद्यापही काही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.