शेतकऱ्यांना आता रेल्वेने पाठवता येणार फळे-भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:43 PM2020-04-11T17:43:38+5:302020-04-11T17:46:55+5:30
यासाठी शेतकरी, शेतकरी बचत गट, व्यापाºयांना रेल्वेकडे नोंदणी करावी लागणार आहे.
अकोला : शेतकऱ्यांच्या फळे, भाजीपाल्याचे नुकसान होऊ नये म्हणून कृषी विभागाने नवीन उपक्रम हाती घेतला असून, शेतकरी व व्यापाºयांना भाजीपाला, फळे आता बाहेरगावी पाठवता येणार आहेत. त्यासाठी रेल्वेची रॅक उपलब्ध होणार आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २३ मार्च मध्यरात्रीपासून देशात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच प्रकारची वाहतूक बंद आहे. याचा फटका शेतकºयांना बसला असून, परराज्यात शेतमाल पाठविणे बंद झाले आहे. शेतकºयांचे हे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभाग सरसावला आहे. शेतकºयांना फळे व भाजीपाला इतर राज्यात पाठवायचा असल्यास तो आता पाठवता येणार आहे. व्यापाºयांनाही फळे, भाजीपाला पाठवता येणार आहे. यासाठी शेतकरी, शेतकरी बचत गट, व्यापाºयांना रेल्वेकडे नोंदणी करावी लागणार आहे. शेतमाल पोहोचवण्यासाठी लागणारा खर्च इतर रेल्वेच्या काही कागदांची पूर्तता करावी लागणार आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणावर फळे, फुले व इतर भाजीपाला दरवर्षी इतर राज्यात पाठविण्यात येतो. विदर्भातून संत्रा, खान्देशातून केळी, नाशिक, सांगली जिल्ह्यातून द्राक्ष, डाळिंब, पपई यासह इतर फळे, भाजीपालादेखील पाठवला जातो. अकोला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कागदी लिंबू हा इतर राज्यात पाठविण्यात येतो; परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रोड वाहतूक बंद असल्याने शेतकºयांचा माल तसाच पडून आहे. त्यामुळे शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत होत आहे. हे टाळण्यासाठी शेतकºयांना ही दिलासादायक बातमी कृषी विभागाने दिली आहे. यासंदर्भात अधिक माहिती १३८ या क्रमांकावर शेतकºयांना उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी लोकमतला दिली.