शेतकऱ्यांनी बैलांप्रति केली कृतज्ञता व्यक्त; वाशिम जिल्ह्यात पोळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 05:20 PM2018-09-09T17:20:01+5:302018-09-09T17:47:50+5:30
वाशिम: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला पोळा सण रविवारी जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला पोळा सण रविवारी जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी त्यांचा खरा सोबती असलेल्या बैलांना सजवून पुरणपोळीचा घास भरवित आपली कृतज्ञता व्यक्त केली. या सणानिमित्त शेतकºयांनी बैलांची केलेली सजावट लक्ष वेधणारी ठरली.
पोळा हा जिल्हाभरात ९ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरात करण्यात आला. वर्षभर शेतात राबराब राबणाºया बैलाप्रती बळीराजा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या दिवशी शेतकºयांनी बैलांची उत्साहात सजावट केली. या सणाच्या पूर्वसंध्येला शेतकºयांनी बैलांना नदी, ओढयात नेऊन खांदमळण केली. त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झुल टाकून, शिंगे रंगवून, डोक्याला बाशिंग, मसाट्या, गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवे वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, घालून पोळ्याच्या ठिकाणी आणले. सायंकाळी पोळा फुटल्यानंतर घरोघरी बैल फिरविले. नागरिकांनीही ठिकठिकाणी बैलांची पुजा करून पुरणपोळीचा नैवेद्य भरविला.