शेतकरी संप : रस्त्यावर भाजीपाला फेकून आंदोलन
By admin | Published: June 3, 2017 02:48 PM2017-06-03T14:48:51+5:302017-06-03T14:48:51+5:30
कोट शहरात शेतकरी व दुध उत्पादक संपावर असल्यामुळे शनिवारी (3 जून) रोजी सकाळी शिवाजी चौकातील शिवरायाचे पुतळ्याला दुग्धाभिषेक करून सरकारविरोधात निषेध नोंदवण्यात आला.
Next
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि.3 - अकोट शहरात शेतकरी व दुध उत्पादक संपावर असल्यामुळे शनिवारी (3 जून) रोजी सकाळी शिवाजी चौकातील शिवरायाचे पुतळ्याला दुग्धाभिषेक करून सरकारविरोधात निषेध नोंदवण्यात आला. तसंच रस्त्यावर भाजीपालाही फेकला.
शेतकरी व दूध उत्पादकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सरकारला बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना करत हजारो लिटर दूधाचा अभिषेक केला. अनेक आंदोलकांनी दूध रस्त्यावर टाकल्याने रस्त्यावर दुधाचे लोट वाहत होते.
यावेळी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, कर्जमाफी व्हावी आणि दुधाला 50 रुपये लिटर भाव मिळावा व पशुखाद्यावर सबसिडी लागू व्हावी, अशा मागण्यांचे घोषणा देण्यात आल्या.