विम्याचा हप्ता भरल्याप्रमाणे विमा मिळाला नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:15 AM2021-06-04T04:15:59+5:302021-06-04T04:15:59+5:30
तक्रारीमध्ये शेतकऱ्यांनी खरीप विमा प्रीमिअम जुलै २०२० मध्ये वरुर येथील सी.एस.सी. केंद्रावर ऑनलाईन भरले होते. याबाबत त्यांना पावती सुध्दा ...
तक्रारीमध्ये शेतकऱ्यांनी खरीप विमा प्रीमिअम जुलै २०२० मध्ये वरुर येथील सी.एस.सी. केंद्रावर ऑनलाईन भरले होते. याबाबत त्यांना पावती सुध्दा देण्यात आली. परंतु विम्याची अल्प रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रीमिअम क्युआर कोड चेक केले असता, प्रत्यक्षात जास्त हप्त्याची रक्कम भरल्यानंतरही सी.एस.सी. केंद्र चालकाने कंपनीकडे अल्प किस्त भरली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या रकमेचा विमा मिळू शकला नाही. जवळपास ३५० शेतकऱ्यांना प्रीमिअमप्रमाणे विम्याची रक्कम मिळाली नसल्याने मोठे नुकसान झाले आहे. याबाबत केंद्र चालकाला विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. भरलेल्या प्रीमिअमप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी संदीप वानखडे, स्वप्निल सिरसाट, चेतन डोईफोडे, बाळासाहेब पाचपोहे, प्रल्हाद बोरोकार, हरिदास अवारे, गणेश गुंजकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.