कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकर्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:29 AM2017-09-15T01:29:41+5:302017-09-15T01:30:07+5:30
कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत संपण्यास एक दिवसांचा कालावधी उरला असतानाच, कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शासनामार्फत गुरुवारी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुषंगाने कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर शेतकर्यांची गर्दी होत असून, सकाळपासूनच सेतू केंद्रांवर शेतकर्यांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत संपण्यास एक दिवसांचा कालावधी उरला असतानाच, कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शासनामार्फत गुरुवारी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुषंगाने कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर शेतकर्यांची गर्दी होत असून, सकाळपासूनच सेतू केंद्रांवर शेतकर्यांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे.
कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शासनामार्फत यापूर्वी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुषंगाने कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी केवळ एक दिवसांचा कालावधी उरला असल्याने, अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर गुरुवारी शेतकर्यांची गर्दी झाली होती. सकाळपासूनच सेतू केंद्रांवर कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकर्यांच्या रांगा लागत असतानाच, कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शासनामार्फत सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार शेतकर्यांना कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज २२ सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहेत. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली असली, तरी अर्ज भरण्यासाठी मात्र शेतकर्यांची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सेतू केंद्रांवर कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरताना बायोमेट्रिक मशीनवर अनेक शेतकर्यांचा ‘अंगठा’ आधार क्रमांकाशी संलग्नित होत नसल्याने, संबंधित शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यात येत नाहीत. आधार क्रमांकाशी अंगठा संलग्नित होत नसल्याचा वांधा कायम असल्याने, धावपळ करूनही कर्जमाफीचा ऑनलाइन अर्ज भरणार कसा, या समस्येने अनेक शेतकरी हैराण झाले आहेत.