सावकारी कर्जमाफीत शेतकरी याद्यांची पडताळणी रेंगाळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 11:10 AM2020-01-19T11:10:41+5:302020-01-19T11:10:47+5:30

शेतकºयांच्या याद्या पडताळणी रेंगाळल्याने, जिल्ह्यातील कर्जदार शेतकºयांना सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Farmer's debt-free farming lists are scrutinized! | सावकारी कर्जमाफीत शेतकरी याद्यांची पडताळणी रेंगाळली!

सावकारी कर्जमाफीत शेतकरी याद्यांची पडताळणी रेंगाळली!

Next

- संतोष येलकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी ११ हजार कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांकडे पाठविण्यात आल्या. त्यापैकी ९०० शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी तलाठ्यांकडून करण्यात आली; मात्र १० हजार १०० शेतकºयांच्या याद्या पडताळणीसाठी अद्याप तलाठ्यांकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या याद्या पडताळणी रेंगाळल्याने, जिल्ह्यातील कर्जदार शेतकºयांना सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शासन निर्णयानुसार विदर्भ-मराठाड्यातील शेतकºयांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करण्यात आले आहे. त्यानुसार पात्र शेतकºयांना सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याचा कार्यक्रम सहकार विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत परवानधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या ११ हजार कर्जदार शेतकºयांच्या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत गत नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयाकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आल्या. कर्जदार शेतकरी सातबाराधारक आहेत की नाही, कोणी नोकरीवर आहे काय, पेन्शनधारक आहेत काय, यासंदर्भात पडताळणी करण्यासाठी तहसील कार्यालयांकडून शेतकºयांच्या याद्या संबंधित तलाठ्यांकडे पाठविण्यात आल्या. ११ हजार शेतकºयांच्या याद्यांपैकी ९०० शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी करण्यात आली असली तरी, उर्वरित १० हजार १०० शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी अद्याप तलाठ्यांकडे प्रलंबित आहे. शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी रेंगाळल्याने कर्जदार शेतकºयांना सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ केव्हा मिळणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


११ हजार शेतकºयांचे १५ कोटींचे कर्ज होणार माफ!
सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या ११ हजार कर्जदार शेतकºयांचे १५ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. कर्जदार शेतकºयांचे कर्ज माफ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी, शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी मात्र रेंगाळली आहे.

सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील कर्जदार ११ हजार शेतकºयांच्या याद्या नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या. तहसील कार्यालयांकडून शेतकºयांच्या याद्या पडताळणीसाठी तलाठ्यांकडे पाठविण्यात आल्या. त्यापैकी पडताळणी करण्यात आलेल्या ९०० शेतकºयांच्या याद्या प्राप्त झाल्या असून, उर्वरित शेतकरी याद्यांची पडताळणी अद्याप प्रलंबित आहे.
-डॉ. प्रवीण लोखंडे,
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

Web Title: Farmer's debt-free farming lists are scrutinized!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.