नुकसानभरपाईपासून शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:16 AM2020-12-23T04:16:15+5:302020-12-23T04:16:15+5:30
मोकाट जनावरांमुळे वाहतूक प्रभावित दहिहांडा : येथून जाणाऱ्या राज्यमार्गावर तसेच गावातील प्रमुख चाैकात मोकाट जनावरे ठाण मांडून बसत ...
मोकाट जनावरांमुळे वाहतूक प्रभावित
दहिहांडा : येथून जाणाऱ्या राज्यमार्गावर तसेच गावातील प्रमुख चाैकात मोकाट जनावरे ठाण मांडून बसत आहेत. मोकाट जनावरे हे रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडत असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.
तुरीवर विविध किडींचा प्रादुर्भाव
कुरूम : तूर पिकावर किडींचा प्रादुर्भाव झाला असून, कीटकनाशकाची फवारणी कशी करावी याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे किडीचा प्रादुर्भावामुळे उत्पादन घटणार आहे.
कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरवस्था
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील तांदळी चिंचोली (गणू) येथील नदीच्या पात्रावर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरवस्था होऊन बंधारा गेटअभावी लिकेज झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे रब्बी पिकांना पाणी कसे द्यावे याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.