शासन निर्णयाअभावी थकबाकीदार शेतकरी संभ्रमात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 03:28 PM2018-03-27T15:28:31+5:302018-03-27T15:28:31+5:30
अकोला : कर्जमाफी योजनेत ३० जून २०१७ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा गत महिन्यात शासनामार्फत करण्यात आली; मात्र यासंदर्भात शासन निर्णय अद्याप काढण्यात आला नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत थकबाकीदार शेतकºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
संतोष येलकर
अकोला : कर्जमाफी योजनेत ३० जून २०१७ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा गत महिन्यात शासनामार्फत करण्यात आली; मात्र यासंदर्भात शासन निर्णय अद्याप काढण्यात आला नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली. कर्जमाफीसाठी गत २४ जुलै ते २२ सप्टेंबर या कालावधीत थकबाकीदार शेतकºयांकडून ‘आॅनलाइन’ अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामध्ये कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आली. त्यानंतर ३० जून २०१७ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा गत महिन्यात शासनामार्फत करण्यात आली; मात्र यासंदर्भात शासनाचा निर्णय अद्याप जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयांना प्राप्त झाला नाही. शासन निर्णय अद्याप काढण्यात आला नसल्याने, कर्जमाफी योजनेंतर्गत ३० जून २०१६ नंतर ३० जून २०१७ पर्यंत कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खरीप हंगामासाठी पीक कर्ज काढण्याचा पेच!
येत्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज काढण्याकरिता गतवर्षी (२०१७) पीक बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे. ३० जून २०१७ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत शासन निर्णय अद्याप काढण्यात आला नाही. तसेच नवीन कर्जासाठी गतवर्षीच्या पीक कर्जाची परतफेड केल्यास, कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे येत्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज काढण्याचा पेच ३० जून २०१७ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यां समोर निर्माण झाला आहे.