कृषी प्रयोगांमुळे मेळघाटात शेतकरी आत्महत्या नाहीत - कोल्हे

By admin | Published: May 2, 2016 02:19 AM2016-05-02T02:19:31+5:302016-05-02T02:19:31+5:30

मेळघाटात सामूहिक प्रयत्नातून शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त.

Farmers do not commit suicides in Melghat due to agricultural experiments - Kol | कृषी प्रयोगांमुळे मेळघाटात शेतकरी आत्महत्या नाहीत - कोल्हे

कृषी प्रयोगांमुळे मेळघाटात शेतकरी आत्महत्या नाहीत - कोल्हे

Next

अकोला: महाराष्ट्रात, विशेषत: विदर्भ, मराठवाड्यात होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्या क्लेशदायक आहेत; परंतु आमच्या मेळघाटात सामूहिकतेने केलेल्या प्रयत्नांमधून आम्ही एकही शेतकर्‍याची आत्महत्या होऊ दिली नाहीत. मेळघाटात आदिवासी शेतकर्‍यांना सोबत घेऊन विविधांगी कृषी प्रयोग राबविले. १९९0 पासून आम्ही शेतकर्‍यांना विश्‍वासात घेऊन सोयाबीन, ज्यूट, हळदीचा प्रयोग केला. तो यशस्वी झाला. त्यानंतर आम्ही डेहरादूनवरून बटाटा आणला. कापूस लागवड केली. ती यशस्वी झाली. विशेष म्हणजे, लेबर ओरिएन्टेड शेती आम्ही केली नाही. वर्षभर आदिवासी शेतकर्‍यांच्या हातात पैसा खेळत राहतो. त्यामुळेच मेळघाट आत्महत्यामुक्त आहे. अशी माहिती वैरागड येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे यांनी दिली. अकोल्यात रविवारी एका कार्यक्रमासाठी डॉ. कोल्हे आले असता, त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. मेळघाट हा परिसर विशेषत: कुपोषणासाठी ओळखला जातो. येथील महिला व पुरुषांमध्ये प्रचंड व्यसनाधीनता होती. ती आता कमी झाली आहे. शासनाने आरोग्य योजना राबविल्या; परंतु त्याला र्मयादा आहेत. अनेक योजना आदिवासी बांधवापर्यंत पोहोचत नाहीत. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात वसलेलं हे गाव जेमतेम दोन हजार वस्तीचं. धारणी-वैरागड असा प्रवास. पावसाळ्यात धारणीच्या पुढे रस्ते बंद . ४0 कि.मी. अंतर पायी चालत वैरागड गाठावं लागतं. या भागाकडे शासनाचं दुर्लक्ष. रस्ते नाहीत, वीज नाही; मग शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे आवश्यक सुविधांविषयी तर बोलायलाच नको. अशा ठिकाणी आम्ही आदिवासी बांधवांच्या मदतीने परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे डॉ. कोल्हे म्हणाले.

Web Title: Farmers do not commit suicides in Melghat due to agricultural experiments - Kol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.