काठेवाडी गुराख्यांना दुधलम परिसरातील शेतकरी कंटाळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:19 AM2021-07-30T04:19:38+5:302021-07-30T04:19:38+5:30
दुधलम परिसरात त्यांनी एक शेत विकत घेऊन त्याच शेतात शेकडो गुरांसह गुराखी वास्तव्यास आहेत. गायी-म्हशी चारण्यासाठी ते सायंकाळच्या वेळेला ...
दुधलम परिसरात त्यांनी एक शेत विकत घेऊन त्याच शेतात शेकडो गुरांसह गुराखी वास्तव्यास आहेत. गायी-म्हशी चारण्यासाठी ते सायंकाळच्या वेळेला शेतीवर कोणी नसताना उभ्या पिकात चारण्यास सोडत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांना समजावून सांगण्यासाठी गावकरी, पोलीसपाटील व सरपंच गेले असता, त्यांनी गावकऱ्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. शेतातील होत असलेल्या नुकसानाची आम्हाला पर्वा नाही, असेही काठेवाड गुराखी म्हटले.
परवानगी नसताना वनजमिनीवर ताबा
काठेवाडी गुराख्यांना परवानगी नसतानासुद्धा, हे लाेक या शिवारात स्थायिक झाले व वनविभागाच्या जमिनीवरसुद्धा ताबा केला आहे. या संदर्भात सर्व गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी त्यांच्या होत असलेल्या त्रासापासून मुक्तता करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.