शेतक-यांचे ‘अर्थचक्र’ बिघडले!
By admin | Published: May 7, 2017 02:50 AM2017-05-07T02:50:22+5:302017-05-07T02:50:22+5:30
तूर खरेदीचा गोंधळ; अकोल्यातील स्थिती; हमी दराने खरेदी बंद, व्यवहार कोलमडले!.
संतोष येलकर
अकोला : हमी दराने तूर खरेदी बंद करण्यात आली आणि बाजारात तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने, निम्म्यापेक्षा अधिक तूर शेतकर्यांच्या घरातच पडून आहे, त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडल्याच्या स्थितीत शेतीच्या मशागतीसह तूर उत्पादक शेतकर्यांचे सर्वच व्यवहार कोलमडले आहेत. त्यानुषंगाने तूर खरेदीच्या वांद्यात तूर उत्पादक शेतकर्यांचे ह्यअर्थचक्रह्ण बिघडले आहे.
हमी दराने ह्यनाफेडह्णमार्फत तूर खरेदी गत २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली. त्यानंतर राज्यातील ह्यनाफेडह्णच्या खरेदी केंद्रांवर तुरीचे मोजमाप बाकी असलेल्या तुरीची खरेदी करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी आलेल्या तुरीचे पंचनामे करून, शासनामार्फत तूर खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली; परंतु नाफेडद्वारे तूर खरेदीत मोजमापासाठी प्रचंड विलंब झाल्याने, बहुतांश तूर उत्पादक शेतकर्यांनी खरेदी केंद्रांवर तूर विकण्यासाठी आणणे टाळले. २२ एप्रिलपासून हमी दराने तूर खरेदी बंद करण्यात आली आणि बाजारात व्यापार्यांकडून तुरीला प्रती क्विंटल ३ हजार ८00 ते ३ हजार ९00 रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने, निम्म्यापेक्षा अधिक तूर अद्याप तूर शेतकर्यांच्या घरातच पडून आहे. त्यामुळे तूर विकल्यानंतर मिळणार्या पैशातून शेतीच्या मशागतीसह बियाणे-खतांची खरेदी, मजुरांची मजुरी व पेरणीचा खर्च भागविण्याचे तूर उत्पादक शेतकर्यांनी केलेले नियोजन कोलमडले आहे, तसेच पैसा नसल्याने आर्थिक अडचणीत सापडल्याच्या स्थितीत मुला-मुलींचे लग्न लांबणीवर टाकण्यासह शेतकर्यांच्या सर्वच व्यवहारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तूर खरेदीने तूर उत्पादक शेतकर्यांचे ह्यअर्थचक्रह्ण बिघडल्याची स्थिती अकोला जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात असल्याचे वास्तव आहे.
बँकेचे कर्ज कसे भरणार, पेरणीचा खर्च कसा भागवणार?
तूर घरातच पडून असून, पावसाळा तोंडावर आला आहे; मात्र जवळ पैसा नसल्याच्या स्थितीत शेतीची मशागत, बियाणे-खतांची खरेदी, बँकेच्या कर्जाचा भरणा कसा करणार आणि खरीप पेरणीचा खर्च कसा भागवणार, असा प्रश्न या शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे.
शेतकर्यांना "अच्छे दिन" केव्हा येणार?
हमी दराने तुरीची खरेदी बंद करण्यात आली. बाजारात तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने, तूर घरातच पडून आहे. त्यामुळे तूर विकल्यानंतर मिळणार्या पैशातून करावयाच्या व्यवहाराचे नियोजन कोलमडले आहे. पैसा नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकर्यांना ह्यअच्छे दिनह्ण केव्हा येणार, असा प्रश्न तूर उत्पादक शेतकर्यांकडून उपस्थित केला जात आहे.
हमी दराने तूर खरेदी बंद करण्यात आली. बाजारात तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने, तूर घरातच ठेवल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर आला तरी, जवळ पैसा नसल्याने, शेतीची मशागत, पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न निर्माण झाला असून, मुला-मुलींचे लग्न लांबणीवर टाकण्याची वेळ आली आहे.
- विनोद बिलबिले
तूर उत्पादक शेतकरी, कान्हेरी गवळी.
तुरीचे उत्पादन चांगले झाले; मात्र हमी दराने खरेदी बंद आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, तूर उत्पादक शेतकर्यांचे सर्वच आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत.
-संजय वैराळे
तूर उत्पादक शेतकरी, बोरगाव वैराळे.
हमी दराने तूर खरेदी बंद करण्यात आली. बाजारात योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे पैसा नसल्याने तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून, शेतीची मशागत, पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बँकेच्या कर्जाचा भरणा, गहाण ठेवलेले दागिने सोडणे व इतर व्यवहारांवर परिणाम झाला आहे.
- विलास दांदळे
तूर उत्पादक शेतकरी, खिरपुरी बु.
हमी दराची तूर खरेदी बंद असून, बाजारात तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने, निम्म्यापेक्षा अधिक तूर शेतकर्यांच्या घरात पडून आहे. त्यामुळे तुरीचे चांगले उत्पादन घेऊन, शेतकर्यांना फायदा झाला नाही. तूर विकण्याची चिंता असल्याने, खरीप पेरणी, बियाणे-खते खरेदीसाठी पैसा कोठून आणणार आणि बँकेच्या पीक कर्जाचा भरणा कसा करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- नीलेश हाडोळे
तूर उत्पादक शेतकरी, उमरी-अकोला.