चारापिकांवर शेतकऱ्यांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:15 AM2020-12-09T04:15:04+5:302020-12-09T04:15:04+5:30

घाणीने तुंबल्या नाल्या आपातापा : नियमित सफाई करण्याबाबत उदासीनता असल्याने नाल्या घाण, कचऱ्याने तुंबल्या आहेत. त्यामुळे गावात दुर्गंधी परसल्याने ...

Farmers' emphasis on fodder crops | चारापिकांवर शेतकऱ्यांचा भर

चारापिकांवर शेतकऱ्यांचा भर

Next

घाणीने तुंबल्या नाल्या

आपातापा : नियमित सफाई करण्याबाबत उदासीनता असल्याने नाल्या घाण, कचऱ्याने तुंबल्या आहेत. त्यामुळे गावात दुर्गंधी परसल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे चित्र आपातापा येथे पाहायला मिळत आहे. याकडे दुर्लक्ष असल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे.

‘कपाशीची पाहणी करून पंचनामे करा !’

बाळापूर : यावर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करण्यात आली; मात्र कपाशीचे नुकसान झाले असून, पिकाचे सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आधीच कर्जाच्या बोजाखाली असलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. त्यामुळे कपाशीची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ऑनलाइन खरेदी वाढली !

अकोट : शहरी भागात तरुणांकडून ऑनलाइन खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. खरेदीचे लोन सध्या ग्रामीण भागातही पसरत असून, तेथील तरुणांनाही ऑनलाइन खरेदीचे आकर्षण आहे. नातेवाइकांचे पत्ते देऊन खरेदी साहित्य प्राप्त केले जात आहे.

आयोगाच्या निधीसाठी अडथळा

बार्शीटाकळी : १५वा वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींनी पीएफएमएस या ऑनलाइनप्रणालीतूनच खर्च करण्याचे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहे. त्याकरिता सरपंच आणि ग्रामसेवकांची डिजिटल स्वाक्षरी आवश्यक असल्याने चांगलीच दमछाक होत आहे.

कपाशीचे नुकसान; पीकविम्याचा लाभ !

तेल्हारा : यंदा ऑक्टोबरअखेरपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळेच कपाशीवर बोंडसडचे संकट ओढावले आहे. या नैसर्गिक आपत्तीसाठी भरपाई देण्याची तरतूद पंतप्रधान विमा योजनेत असल्याने शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी समोर आली आहे.

‘ऑनलाइन वीजबिल भरा !’

दहिहांडा: महावितरणकडून वीजग्राहकांना मोबाइल एसएमएस सुविधा नि:शुल्क उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या सुविधेचा वापर करून ऑनलाइन वीजबिल भरा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. वीजपुरवठा केव्हा खंडित होणार, पूर्ववत केव्हा होणार याची माहिती ग्राहकांना मोबाइल क्रमांकावर देण्यात येत आहे.

Web Title: Farmers' emphasis on fodder crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.