बंधारा फुटल्याने शेतकऱ्याची शेती गेली खरडून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:23 AM2021-08-28T04:23:15+5:302021-08-28T04:23:15+5:30

कृषी विभागांतर्गत २०१५ मध्ये नागोराव रघुनाथ सोनोने शेत सर्व्हे नं ६२ मधील कृषी विभागाने त्यांच्या शेताला लागून मातीचा मोठा ...

Farmer's farm ruined due to dam burst! | बंधारा फुटल्याने शेतकऱ्याची शेती गेली खरडून!

बंधारा फुटल्याने शेतकऱ्याची शेती गेली खरडून!

Next

कृषी विभागांतर्गत २०१५ मध्ये नागोराव रघुनाथ सोनोने शेत सर्व्हे नं ६२ मधील कृषी विभागाने त्यांच्या शेताला लागून मातीचा मोठा बंधारा बांधण्यात आला होता. मात्र, चक्क त्या वर्षांमध्येच मातीचा बंधारा फुटून शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. दरवर्षी होत असलेल्या पिकाचे नुकसानभरपाई मिळण्याकरिता अर्ज करीत आहेत. मात्र, कृषी विभागाच्या बेजबाबदारपणामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कृषी विभागांतर्गत तक्रार केल्यानंतरसुद्धा त्यांना कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांनी त्यांची तक्रारीची फाईल काढून बघावी लागेल. असे सांगण्यात आले आहे.

फोटो :

नुकसानभरपाई न मिळाल्यास उपोषण

कृषी विभागाचा बंधारा फुटल्यामुळे सतत पाच वर्षे पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पाच वर्षांची नुकसानभरपाई न मिळाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्याने दिला आहे.

Web Title: Farmer's farm ruined due to dam burst!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.