‘लॉकडाऊन’मध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 10:38 AM2020-04-05T10:38:31+5:302020-04-05T10:38:38+5:30
नवीन पीक कर्जाचे वितरण अद्याप सुरु करण्यात आले नसून, शेती मशागतीची कामेही थांबली आहेत.
- संतोष येलकर
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ‘लॉकडाऊन ’लागू करण्यात आले असून, सर्वच व्यवहारांवर परिणाम झाला आहे. त्यामध्ये नवीन पीक कर्जाचे वितरण अद्याप सुरु करण्यात आले नसून, शेती मशागतीची कामेही थांबली आहेत.त्यामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोमलमडले आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात ‘लॉकडाऊन ’ जाहीर करण्यात आले असून, राज्यभरात २४ मार्चपासून संचार बंदी लागू करण्यात आली आहे.‘लॉकडाऊन’ मध्ये अत्यावश्यक सेवा आणि जीवनाश्यक वस्तू वगळता सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामध्ये शेतमालाची खरेदी बंद असून, नवीन पीक कर्जाचे वाटप अद्याप सुरु करण्यातआले नाही. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकºयांकडे पैसा नसल्याने कुटुबांचा उदरनिर्वाह, दैनंदिन गरजा व आरोग्यविषयकखर्च भागविण्याचा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. अडचणीच्या स्थितीत शेतकºयांजवळ पैसा नसल्याने शेती मशागतीची कामेही थांबली आहेत. त्यानुषंगाने ‘लॉकडाऊन’ मध्ये शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
‘नाफेड’ला विकलेल्या तुरीचे चुकारे थकित !
आधारभूत किंमत योजनेंतर्गत ‘नाफेड’ मार्फत तूर खरेदीत हमी दराने गत ३ मार्चपर्यत शेतकºयांनी विकलेल्या तुरीचे चुकारे अद्याप थकीत असून, विकलेल्या तुरीचे चुकारे केव्हा मिळणार, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
कापणीला आलेला गहू, हरभरा शेतातच!
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’ मध्ये शेतीची कामे ठप्प झाली आहेत. मजूर मिळत नसल्याने अनेक भागात कापणीला आलेल्या गहू व हरभºयाचे पीक अद्याप शेतातच उभे असून, फरदडीच्या कपाशीची वेचणीही बाकी आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ लागू असल्याच्या परिस्थितीत शेतमालाची खरेदी-विक्री बंद असल्याने, शेतमाल शेतकºयांच्या घरात पडून आहे. नवीन पीक कर्जाचे वितरण सुरु करण्यात आले नसून, नाफेडला विकलेल्या तुरीचे चुकारे मिळाले नाही.त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.-शिवाजीराव भरणेशेतकरी, रामगाव, ता.अकोला.