शेतक-यांना मिळणार परतावा
By admin | Published: June 15, 2016 02:08 AM2016-06-15T02:08:15+5:302016-06-15T02:08:15+5:30
‘महाबीज’ची बियाण्यांची दरवाढ रद्द; मुंबईत आज बैठक!
अकोला: शेतकर्यांच्या हक्काचे बियाणे समजल्या जाणार्या ह्यमहाबीजह्ण बियाण्यांच्या किमती वाढल्यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला. या दरवाढी विरोधात शेतकर्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी ह्यमहाबीजह्ण ने केलेली बियाणो दरवाढ रद्द केली आहे. या निर्णयानंतर आतापर्यंत महाबीजने विकलेल्या बियाण्यांचा शेतकर्यांना परतावा तसेच ह्यमहाबीजह्ण चा तोटा कसा भरून काढायचा, असा प्रश्न महाबीजसमोर उभा ठाकला असून, यासंदर्भात बुधवारी मंत्रालयामध्ये बैठक होत आहे. अनियमित पावसामुळे बियाण्याचे झालेले कमी उत्पादन अन् शेतकर्यांकडून वाढलेली मागणी यामुळे महाबीजला बियाण्यांचे जास्त उत्पादन करावे लागले. ह्यमहाबीजह्ण शेतकर्यांना शेतावर बियाणे उत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी बाजारभावापेक्षा २५ टक्के अधिक मोबदला देतो. या खर्चासह वाहतुकीचा खर्च या कारणामुळे महाबीजने भाववाढीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत मागील वर्षाच्या तुलनेत ९ टक्के वाढ झाली तर तूर, उडीद आणि मूग या डाळवर्गीय पिकांच्या बियाण्यांच्या किमतीत हीच दरवाढ ५0 ते ६0 टक्के इतकी झाली, त्यामुळे दुष्काळाच्या फेर्यात अडकलेल्या शेतकर्यांना हक्काच्या बियाण्यांची दरवाढ सहन करावी लागली आहे. ही दरवाढ आता रद्द झाल्याने शेतकर्यांकडून घेतलेली वाढीव रक्कम महाबीजला परत करावी लागणार आहे.