शेतकऱ्याने गावोगावी जाऊन केली टरबूज विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 05:58 PM2020-04-24T17:58:09+5:302020-04-24T17:58:17+5:30
हिंगणी बु. येथील शेतकºयाने मेहनतीने पिकविलेले टरबूज व्यापाºयांना कमी दरात न विकता स्वत: गावोगावी जाऊन विकणे सुरू केले आहे.
तेल्हारा : लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना शेतमाल विकताना कसरत करावी लागत आहे. या संधीचा लाभ घेत व्यापारीही कमी भावाने शेतमाल मागत आहेत. हिंगणी बु. येथील शेतकºयाने मेहनतीने पिकविलेले टरबूज व्यापाºयांना कमी दरात न विकता स्वत: गावोगावी जाऊन विकणे सुरू केले आहे. त्यामुळे त्यांना चांगला भाव मिळत असून, ग्रामस्थांना ताजे फळ उपलब्ध झाले आहे.
तेल्हारा तालुक्यात यावर्षी रब्बी हंगामात शेतकºयांनी टरबूज-खरबूज लागवड केलेली आहे. टरबूज फळ पक्व होत आहे; परंतु लॉकडाउनमुळे विक्री होत नाही. व्यापारी कमी भावात मागणी करतात. त्यामुळे टरबूज-खरबूज कसे विकावे, हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. व्यापारी कवडीमोल भावाने खरेदी करून शेतकºयांची फसवणूक करीत आहेत; परंतु अशाही बिकट परिस्थितीत सापडलेल्या हिंगणी बु. या गावातील रवी गजाननराव नराजे या शेतक ºयाने कोणत्याही व्यापाºयाला पीक विक्री न करता स्वत: आजूबाजूच्या गावात जाऊन विक्री केली. त्यामुळे त्यांना भावही चांगला मिळत असल्याने नफा मिळत आहे. ‘लॉकडाउन’मध्येही त्यांनी टरबूज पिकाची चांगल्या दरात विक्री केली आहे. त्यांचा आदर्श इतर शेतक ºयांनी घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)