मान्सूनपूर्व पावसाने शेतकरी सुखावला; पेरणीबाबत संभ्रम, बियाणे बाजारात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 01:57 PM2018-06-04T13:57:36+5:302018-06-04T13:57:36+5:30
अकोला: मान्सूनची अनुकूल वाटचाल सुरू असून, भारतीय हवामान शास्त्र विभागासह वेगवेगळ््या खासगी हवामान शास्त्र संस्थांतर्फे वेळेवर आगमन होण्याचे भाकीत वर्तविण्यात येत आहे. त्या अगोदर मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिल्याने शेतकरी सुखावला; पण बियाणे कोणते पेरावे याबाबत संभ्रम असल्याने बियाणे बाजारात शुकशुकाट आहे. हे चित्र विदर्भातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आहे.
अकोला: मान्सूनची अनुकूल वाटचाल सुरू असून, भारतीय हवामान शास्त्र विभागासह वेगवेगळ््या खासगी हवामान शास्त्र संस्थांतर्फे वेळेवर आगमन होण्याचे भाकीत वर्तविण्यात येत आहे. त्या अगोदर मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिल्याने शेतकरी सुखावला; पण बियाणे कोणते पेरावे याबाबत संभ्रम असल्याने बियाणे बाजारात शुकशुकाट आहे. हे चित्र विदर्भातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आहे.
राज्यात मागच्यावर्षी १ कोटी ४९ लाख हेक्टर खरिपाच्या क्षेत्रापैकी ८० लाख हेक्टर म्हणजे ६० टक्के क्षेत्र सोयाबीन व कापसाचे होते. १० टक्के कापसाचे क्षेत्र वाढल्याने ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पेरणी झाली होती. सोयाबीन क्षेत्र ३८ लाखावर गेले होते; पण मागच्या वर्षी बोंडअळीने कापसाचे प्रचंड नुकसान झाले तर कमी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले. मूग, उडीद पीकही हातचे गेल्याने यावर्षी कोणते पीक घ्यावे याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. कृषी विभाग व महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) मात्र यावर्षी सोयाबीन क्षेत्र वाढण्याचा अंदाज बाधून नियोजन केले आहे. महाबीजने ४ लाख ३० हजार क्विंटल बियाणे बाजारात आणले आहे. तसेच महाबीजच्या या बियाण्यांसह १० लाख ५० हजार क्विंटल बियाणे बाजारात दाखल झाले. कृषी आयुक्तालयाच्यावतीने यावर्षी ३७५ कापसाच्या हायब्रीड वाणांनाही मंजुरी देण्यात आली आहे. महाबीजने इतर वाणांसह तृणधान्य १ लाख ४ हजार २७९ क्विंटल, कडधान्य ४० हजार ४१० क्विंटल व इतर १,३४२ क्विंटल बियाणे मिळून ५ लाख १६ हजार ३२ क्विंटल बियाण्यांचे नियोजन केले असून,९० टक्के बियाणे बाजारात उपलब्ध करू न देण्यात आले. खासगी कंपन्यांचे हे बियाणे बाजारात आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या प्रघातानुसार १५ मेनंतर बाजारात बियाणे खरेदीची लगबग सुरू होते; पण अद्याप शेतकरी बियाणे बाजारात फिरकला नाही.
मान्सूनपूर्व कापसाचे क्षेत्र घटले !
मागच्यावर्षी बोंडअळीने कापसाचे प्रचंड नुकसान केल्याने यावर्षी बीटी कापसाचे बियाने २० मेपर्यंत विक्रीवर शासनाने प्रतिबंध घातला होता. मान्सूनपर्व किंवा धूळपेरणी ही १५ ते ३० मेपर्यंत केली जाते; पण त्या काळात बियाणेच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. तसेच पाणीही उपलब्ध नसल्याचा परिणाम या पेरणीवर झाला.
यावर्षी चांगल्या पावसाचे भाकीत वर्तविण्यात आले असून, मान्सूनपूर्व पावसाने शेतकरी सुखावला. त्यामुळे शेतकरी बियाणे खरेदी करीत आहेत. आणखी एखादा चांगला पाऊस पडल्यास बियाणे खरेदीसाठी गर्दी होईल. शेतकºयांनी बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी, पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी.
ओमप्रकाश देशमुख,
व्यवस्थापकीय संचालक,
महाबीज, अकोला.