रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी ठार
By admin | Published: September 24, 2016 03:07 AM2016-09-24T03:07:34+5:302016-09-24T03:07:34+5:30
बाश्रीटाकळी शिवारातील घटना.
सायखेड(जि. अकोला), दि. २३- रानडुकराने हल्ला करून शेतकर्याला ठार मारल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. सुनील रामभाऊ खोडके (४५) हे २२ सप्टेंबरच्या सायंकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता बाश्रीटाकळी शेतशिवारात त्यांचेवर रानडुकराने हल्ला केला. यामध्ये ते ठार झाले. वडील अद्याप घरी न आल्याने चिंताग्रस्त झालेल्या मुलाने २३ सप्टेंबरच्या पहाटे शेतात जाऊन पाहिले असता वडील मृतावस्थेत आढळल्याचे दिसले. घटनेची माहिती पोलिसांना व वनविभागाला देण्यात आली. ठाणेदार ज्ञानेश्वर जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक लाड, क्षेत्र सहाय्यक एम. एम. शेख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. नितेश खोडके यंचे फिर्यादीवरून पो. स्टे. ला घटनेची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास हेकाँ. केशव भालतिलक करीत आहेत. दरम्यान रानडुकरांच्या वाढत्या हैदोसामुळे शेतीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. यासंदर्भात वनविभागाकडे तक्रारी वाढल्या आहेत.