शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी शेतकरी दिल्लीला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:57 AM2021-01-08T04:57:32+5:302021-01-08T04:57:32+5:30
अकोला : केंद्रीय काळा कृषी कायदा हा शेतकऱ्यांसाेबतच सामान्य नागरिकांसाठीही तेवढाच काळा आहे. या नव्या कृषी कायद्यामुळे केवळ ...
अकोला : केंद्रीय काळा कृषी कायदा हा शेतकऱ्यांसाेबतच सामान्य नागरिकांसाठीही तेवढाच काळा आहे. या नव्या कृषी कायद्यामुळे केवळ कास्तकारच नव्हे तर सामान्य नागरिकांचे सरकारी रेशन दुकानावरील धान्यही त्यांना मिळणार नाही. नागरिकांनी गाफील राहता कामा नये. त्यामुळे देशात फार मोठी अन्न टंचाई या माध्यमातून निर्माण होणार असल्याचा इशारा विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिला.
किसान विकास मंचच्या माध्यमातून दिल्लीत आंदोलन करीत असणाऱ्या कास्तकारांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी शेकडो कास्तकार व कार्यकर्ते विविध वाहनांतून मंगळवारी स्थानीय अशोक वाटिका परिसरातून दिल्लीकडे रवाना झाले. या कास्तकारांच्या बिदाई सोहळ्यात ठाकरे मार्गदर्शन करीत होते. या वेळी माजी आ. लक्ष्मणराव तायडे, तुकाराम बिरकड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, प्रवीण देशमुख, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप वानखडे, रमाकांत खेतान, चंद्रशेखर पांडे गुरुजी, डॉ. सुभाष कोरपे, सय्यद जकीर हुसेन, महेश गणगणे, अर्चना राऊत, गजानन डाफे, दिनेश गोगरकर, आकाश कवडे, राजेश मते, पुष्पा देशमुख, विभा राऊत, प्रशांत मानकर, रेवती तवर, अनिल गायकवाड, संगीता धुरंदर, मनीषा महल्ले तसेच भारतीय कृषक समाज व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.
दिल्ली येथे विकास मंचच्या वतीने राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात येणार असून नंतर शिष्टमंडळ सोनिया गांधी, राहुल गांधी यांना भेटून त्यांना निवेदन देणार आहेत. या वेळी किसान विकास मंचचे संयोजक विवेक पारसकर, अविनाश उर्फ भय्यासाहेब देशमुख यांनी साकार केलेल्या या उपक्रमाचे प्रास्ताविक अविनाश देशमुख यांनी, संचालन सागर कावरे, आनंद वानखडे यांनी तर आभार प्रदर्शन विवेक पारसकर यांनी केले. या वेळी सागर कावरे, राजू पाटील लुले, आनंद वानखडे, गणेश कळसकर, राजीव इटोले, प्रशांत मानकर, श्रीकांत पागृत, प्रकाश सोनोने, पंकज देशमुख, विनोद राऊत, गजानन मुगसे, इस्माइल ठेकेदार, किशोर खरोडे, सुनील रत्नपारखी, अंकुश भेंडेकर, मनीष कांबळे, महेंद्र सुतार, गजानन वानखडे, राजकुमार शिरसाट, आलमगीर खान, प्रमोद बन्सोड, सुजय ढोरे, अभय ताले, निरज खडसे आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.