संशोधित बियाण्यांच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 01:36 PM2019-06-28T13:36:05+5:302019-06-28T13:36:10+5:30
अकोला: बियाणे संशोधित असल्याचे भासवून सोयाबीनचे बियाणे जास्त दरात विक ले जात असून, प्रत्यक्षात गोणीत मात्र दुसरेच बियाणे भरले जात असल्याचा आरोप होत आहे.
अकोला: बियाणे संशोधित असल्याचे भासवून सोयाबीनचे बियाणे जास्त दरात विक ले जात असून, प्रत्यक्षात गोणीत मात्र दुसरेच बियाणे भरले जात असल्याचा आरोप होत आहे.
विदर्भात १६ जून रोजी झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे. कापूस व सोयाबीन बियाणे खरेदीवर शेतकºयांचा जोर आहे. तथापि, शेतकºयांना संशोधित बियाण्यांच्या नावाखाली दुसरे बियाणे विकले जात आहे. ज्या गोण्यामध्ये आमचे संशोधित बियाणे आहे, असे सांगितले जात आहे, ते खरे तर जेएस ३३५, ९३०५ व इतर बियाण्यांचा त्यामध्ये समावेश आहे. म्हणजेच दुसºया कंपनीचे संशोधित बियाणे आपल्या कंपनीच्या गोणीत भरू न त्याला स्वत:च्या कंपनीचा टॅग लावून असे बियाणे २ हजार ते २१०० रुपये प्रति २७ किलोची गोणी विकली जात आहे.
- या स्वरू पाच्या तक्रारी आहेत; पण अद्याप असे काही आढळले नाही. आम्ही चौकस असून, सर्वत्र लक्ष आहे. असे बियाणे आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
मिलिंद जंजाळ,
मोहीम अधिकारी,
कृषी विभाग, जिल्हा परिषद, अकोला.