विषबाधेच्या घटना टाळण्यासाठी गावा-गावांत शेतकऱ्यांच्या बैठका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 11:22 AM2019-09-22T11:22:24+5:302019-09-22T11:22:33+5:30

प्रबोधन करण्याचा अभिनव उपक्रम कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

Farmers' meetings in villages to prevent poisoning! | विषबाधेच्या घटना टाळण्यासाठी गावा-गावांत शेतकऱ्यांच्या बैठका!

विषबाधेच्या घटना टाळण्यासाठी गावा-गावांत शेतकऱ्यांच्या बैठका!

Next

- संतोष येलकर
अकोला : कीटकनाशकाच्या फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना होणाºया विषबाधेच्या घटना टाळण्यासाठी अकोला जिल्ह्यात गावा-गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन, फवारणी करताना काळजी घेण्यासंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्याचा अभिनव उपक्रम कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरू असल्याने अकोला जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन या पिकांवर मोठ्या प्रमाणात कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, कीड व रोगांच्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शेतकºयांकडून पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे; परंतु गत दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे कीटकनाशकांच्या फवारणीतून शेतकरी-शेतमजुरांना होणाºया विषबाधेच्या घटना रोखण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभाग, जिल्हा कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील ७२४ गावांमध्ये शेतकºयांच्या जनजागृती बैठका घेण्यात येत आहेत. गत १५ दिवसांपासून गावा-गावांत शेतकºयांच्या बैठका घेऊन, कीटकनाशकाची फवारणी करताना व फवारणी केल्यानंतर घ्यावयाची काळजी, यासंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकºयांच्या बैठकांमध्ये कृषी विभागाचे अधिकारी, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षकांसह कीटकनाशके, बियाणे व खते कंपन्यांच्या संबंधित प्रतिनिधींकडून फवारणी करताना आणि फवारणीनंतर घ्यावयाची काळजी, यासंदर्भात शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

१४१ मोठ्या, ५८३ लहान गावांमध्ये बैठका!
कीटकनाशक फवारणीसंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्यासाठी जिल्ह्यातील १४१ मोठ्या आणि ५८३ लहान गावांत अशा एकूण ७२४ गावांमध्ये शेतकºयांच्या बैठका कृषी विभागामार्फत घेण्यात येत आहेत.

असे केले जात आहे शेतकºयांचे प्रबोधन!
शेतकºयांच्या बैठकांमध्ये कीटकनाशक फवारणीसंदर्भात प्रबोधन करण्यात येत आहे. त्यामध्ये फवारणी करताना व फवारणी केल्यानंतर घ्यावयाची काळजी, यासंदर्भात ‘एलसीडी प्रोजेक्टर’द्वारे माहितीचे सादरीकरण शेतकरी व शेतमजुरांसमोर करण्यात येत आहे. तसेच सुरक्षा किट परिधान करून फवारणीचे प्रात्यक्षिकही शेतकरी-शेतमजुरांसमोर करण्यात येत आहे.

कीटकनाशक फवारणीतून शेतकरी-शेतमजुरांना होणाºया विषबाधेच्या घटना नियंत्रणासाठी जिल्ह्यातील ७२४ गावांमध्ये शेतकºयांच्या बैठका घेऊन जागृती करण्यात येत आहे. या बैठकांमधून फवारणी करताना व फवारणीनंतर घ्यावयाची काळजी, यासंदर्भात शेतकरी-शेतमजुरांचे प्रबोधन करण्यात येत आहे.
-डॉ. मुरली इंगळे,
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.

 

Web Title: Farmers' meetings in villages to prevent poisoning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.