नया अंदुरा शिवारात शेतकरी रात्री राखणीला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:57 AM2021-01-08T04:57:56+5:302021-01-08T04:57:56+5:30
नया अंदुरा : परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी स्वत:चा ...
नया अंदुरा : परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी स्वत:चा जिवाची पर्वा न करता रात्रीच्या सुमारास राखणीला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वनविभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
खरीप हंगामातील परतीच्या पावसामुळे उडीद, मूग व सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा लागवडी खर्चही वसूल झाला नाहा. रब्बी हंगामात पैशाची जुळवाजूळव करून शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केली. सद्य:स्थितीत हरभरा पीक फुलोरा व गाठे अवस्थेत असताना यंदा मोठ्या उत्पदनाची शेतकऱ्यांना आशा आहे; मात्र शेतशिवार वन्यप्राण्यांचा हैदोस वाढल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. शेतशिवारातील कारंजा रमजानपूर, नया अंदुरा शिवारात रानडुक्कर, हरिण, निलगाय शेतात शिरून पिकांचे नुकसान करीत असल्याचे चित्र आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी रात्रीच्या सुमारास स्वत:चा जीव धोक्यात टाकून राखणीला जात असल्याचे चित्र आहे. कुडकुडत्या थंडीत रात्रीच्या सुमारास शेतकरी पिकांचे रक्षण करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वनविभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
--------------------------
ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याची फूलगळ
गत दोन दिवसांपासून कारंजा रमजानपूर, नया अंदुरा शिवारात ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभऱ्याची फूलगळ होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तसेच हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव वाढल्याने अळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याचे चित्र आहे.
---------