जिल्ह्यात शेतकऱ्यांचा उद्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2017 12:41 AM2017-06-06T00:41:23+5:302017-06-06T00:41:23+5:30

अकोला: विविध मागण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. अनेक ठिकाणी रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला.

Farmers outbreak in the district! | जिल्ह्यात शेतकऱ्यांचा उद्रेक!

जिल्ह्यात शेतकऱ्यांचा उद्रेक!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला: विविध मागण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. अनेक ठिकाणी रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला.
तेल्हारा: येत्या खरीप हंगामापूर्वी शासनाने शेतकऱ्यांच्या सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी, याकरिता राज्यभर शेतकऱ्यांकडून संप सुरू असून, ५ जून रोजी तेल्हारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा जाहीर केला तर विविध संघटनांनीसुद्धा या बंदमध्ये सहभागी होऊन आपला पाठिंबा दिला.
विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या वतीने बंदचे आवाहन ५ जून रोजी करण्यात आले होते. या बंदला तेल्हाऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तेल्हारा तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांना देण्यात आले.
या निवेदनावर सूरज खारोडे, गजानन माझोडकर, विवेक खारोडे, अनंत विखे, नीलेश चव्हाण, रवी राऊत, प्रमोद गावंडे, चंद्रकांत मोरे, वैभव खाडे, ललीत पारसकर, दीपक अहेरकर, विठ्ठल खाडे, निखिल खाडे, सचिन सपकाळ, पुरुषोत्तम तायडे, मुक्ता पारसकर, अमोल गडम, हरीश पाथ्रीकर, जयंत अहीर आदींची स्वाक्षरी आहे.

डॉक्टर, मेडिकल असोसिएशनचा पाठिंबा
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संप व तेल्हारा बंदला डॉक्टर आणि मेडिकल असोसिएशनचा पाठिंबा देऊन शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करणारे निवेदन तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांना दिले. निवेदनावर डॉ. अशोक बिहाडे, डॉ. आर. आर. राठी, डॉ. संजीवनी बिहाडे, डॉ. अनिल मल, डॉ. गीता मल, डॉ. ज्ञानेश्वर तराळे, डॉ. अनुप चौधरी, डॉ. मधुकर मुनेश्वर, डॉ. के. एन. घले, डॉ. डी. एन. राठी, डॉ. एस. बी. राऊत, डॉ. बी. टी. जायले, डॉ. राहुल सदाफळे, डॉ. अंजली सदाफळे, डॉ. विश्वास नेमाडे, डॉ. दीपक राऊत यांच्यासह मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांची स्वाक्षरी आहे.

शेतकऱ्यांनी फेकला भाजीपाला
बंददरम्यान शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थानिक महाराजा अग्रसेन टॉवर चौकात कांदा, भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करीत शासनविरोधी घोषणा दिल्या. यावेळी तालुक्यातील गावागावतून शेतकरी जमले होते.

शेतकरी जागर मंचचा सहभागी
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या तेल्हारा बंदमध्ये शेतकरी जागर मंचचे गजानन वारकरी, चंद्रकांत मोरे, रामा वासनकार हे सहभागी झाले होते. स्थानिक टॉवर चौकात घोषणा देऊन कार्यकर्त्यांसह तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Farmers outbreak in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.