शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी चर्चा क रूनच ‘शेतकरी पॅकेज’द्या! - किशोर तिवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:16 PM2019-01-02T12:16:37+5:302019-01-02T12:17:24+5:30
अकोला : देशातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘शेतकरी पॅकेज’ जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा विचार सुरू आहे; मात्र शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आणि शेतकºयांच्या समस्यांची जाण असणाºयांसोबत चर्चा करूनच सरकारने शेतकरी पॅकेज जाहीर केले पाहिजे, असे मत कै .वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
- संतोष येलकर

देशातील शेतकºयांसाठी दीड लाख कोटी रुपयांचे शेतकरी पॅकेज जाहीर करण्याचा मोदी सरकारचा विचार सुरू आहे. त्यासाठी सरकारची संबंधित काही मंत्री आणि नीती आयोगाच्या सदस्यांसोबत चर्चा सुरू आहे; परंतु देशातील शेतकºयांसाठी कर्जमाफीसह इतर बाबींसंदर्भात शेतकरी पॅकेज जाहीर करण्यापूर्वी मोदी सरकारने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब, भाजपमधील शेतकरी खासदार, विरोधी पक्षातील शेतकरी खासदार, शेतकºयांच्या समस्यांची जाण असणाºया चळवळीतील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करावी आणि त्यानंतरच सरकारने शेतकरी पॅकेज जाहीर करावे, असे किशोर तिवारी यांनी सांगितले. शेतकºयांच्या समस्यांची जाण असणाºयांसोबत चर्चा केल्याशिवाय केंद्र सरकारने शेतकरी पॅकेज जाहीर करू नये, यासंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचेही तिवारी यांनी स्पष्ट केले.
सरसकट कर्जमाफी अन् नगदी अनुदान द्या!
मोदी सरकारने देशातील शेतकºयांना सरसकट कर्जमाफी आणि प्रतिहंगाम, प्रतिएकर दहा हजार रुपये नगदी अनुदान द्यावे, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली.
पंतप्रधानांनी कोरडवाहू भागात दौरा करावा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात दौरा करून शेतकºयांच्या समस्यांची माहिती घ्यावी आणि प्रस्तावित ‘शेतकरी पॅकेज’मध्ये कोरडवाहू शेतकºयांसाठी विशेष बाब म्हणून समावेश करावा, असेही किशोर तिवारी यांनी सांगितले.
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आणि शेतकºयांच्या समस्यांची जाण असणाºयांसोबत चर्चा करूनच सरकारने शेतकरी पॅकेज जाहीर करावे, यासंदर्भात मी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मागणी करणार आहे.
-किशोर तिवारी,
अध्यक्ष, कै .वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन.